Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपने सत्तेच्या मोहापायी पंचवीस वर्षाच्या दोस्तीच्या पाठीत खंजीर खुपसला - खा.गजानन किर्तीकर,


वाई :- ९ आक्टोंबर, महाराष्ट्रासह देशातील जनता कॉंग्रेस-राष्ट्रवादी,यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळली होती, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या भाषण बाजीला भुलून, भूलथापांना बळी पडून देशातील जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेने शिवाय कसलेही अस्तित्व नसताना गेल्या पंचवीस वर्षात शिवसेनेने भाजपशी मैत्रीचे नाते घट्ट टिकवून ठेवल्यानेच भाजपला सत्तेत येता आले. परंतु सत्तेत आलेल्या भाजपने पंचवीस वर्षे साथ दिलेल्या शिवसेनेच्या पाठीत सत्ता येताच खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे. तरी होवू घातलेल्या २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. अशी खरमरीत टीका शिवसेना नेते, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, व खासदार- गजानन किर्तीकर यांनी वाई येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा स्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना केली. याप्रसंगी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री- ना.विजयराव शिवतारे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क उपनेते- प्रा. नितीन बानुगडे-पाटील, पाटणचे शिवसेना आ. शंभूराज देसाई, महिला महाराष्ट्राची संपर्कप्रमुख- युगंधरा साळेकर, जिल्हाप्रमुख- राजेश कुंभारदरे, चंद्रकांत जाधव, हर्शल कदम, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष- डी.एम बावळेकर, महिला जिल्हा प्रमुख- सौ. शारदाताई जाधव, उपजिल्हाप्रमुख-अजित यादव, हरिदास जगदाळे, वाई तालुकाप्रमुख- अनिल शेंडे, महा.तालुकाप्रमुख-यशवंत घाडगे, शिवसेना युंवा जिल्हाप्रमुख- रणजीतसिंह भोसले, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य- महेश शिंदे, वाई शहर प्रमुख- किरण खामकर,उपशहर प्रमुख-गणेश जाधव, योगेश चंद्रस, विवेक भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेचे संपर्क नेते- खा. गजानन किर्तीकर यांनी शिवसेना महाराष्ट्र सरकार मध्ये असतानाही भाजपवर चौफेर टीका करताना म्हणाले, सध्या देशातील जनतेचा भाजप सरकार विषयी पूर्ण भ्रमनिरास झाला असून मोदी सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात केलेली नोट बंदी, जीएसटी,कर प्रणाली. हे दोन्ही निर्णय भाजपच्या अंगलट आले आहेत. यानिर्णया मुळे देशात प्रचंड महागाई वाढली असून सामान्य जनतेचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे. देशाचे पंतप्रधान-नरेंद्रजी मोदी हे भाजपचे नवसाचे बाळ असून त्याचे लाड पुरविता-पुरविता भाजला नाकी-नऊ आले आहे. या लाडाच्या हट्टापायी भाजपला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सध्या देशात भाजपविरोधी जन मत लाट असून शिवसेनेने या भाजप विरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी संघटन मजबूत करण्याची गरज आहे, २०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे त्यांनी ठणकावून त्यांनी सांगितले.
संपर्क उपनेते- नितीन बानुगडे-पाटील यांनी भाजपच्या अच्छे दिनाची खिल्ली उडविताना म्हणाले, कुठे आहेत ते अच्छे दिन, महाराष्ट्रातील जनतेचे अच्छे दिनाचे स्वप्न स्वप्नच राहिले, हिंदूहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतील ८०% समाजकारण व २०% राजकारण करणारी शिवसेना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. प्रसंगी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असतानाही रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल. किर्तीकर साहेब मला आठ शंभूराज देसाई द्या मी संपूर्ण सातारा जिल्हा शिवसेनामय करून संपूर्ण सातारा जिल्यात भगवा फडकावून दाखवितो.

पालकमंत्री- ना. विजयराव शिवतारे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पाणी सिंचनाचे जलसंधारणाचे काम हे शिवसेनेने च केले आहे. सन १९९५ मध्ये युतीचे शासन असताना कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून शिवसेनेने जलसंधार्नाचे १००% प्रश्न मार्गी लावले आहेत. शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय मात्र येथील प्रास्तापित पक्ष नेते घेताना दिसत आहेत. यावेळी पाटण चे आ. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या मेळाव्याने वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेचे शिवसैनिक फुल चार्ज झाल्याचे दिसले. मेळाव्याची सुरुवात छ.शिवाजी महाराज, हिंदुह्र्दय सम्राट- बाळासाहेब ठाकरे, कै, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. संयोजकांच्या वतीने शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांची तीन जिल्ह्यावर संपर्क नेते पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सक्तार करण्यात आला. यावेळी वाई. सातारा. महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव, खंडाळा, जावळी, खटाव,फलटण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.      

Post a Comment

0 Comments