सातारा
मुद्रांक विक्रेते संपावर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली.
डोमासाईल, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर, रेशनिंग कार्ड, खरेदी पत्र, मुक्तार्थ पत्र, खरेदी विक्री, कर्ज प्रकरण, प्रत्येक प्रकारची वारसाची प्रतिज्ञपत्र, अशा विविध 12 ते 14 प्रकरची कागदपत्रे दस्ताऐवज, करण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात जावे लागते. सातारा शहरात अंदाजे 20 ते 25 हजार दस्ताची विक्री होते. 15 लाख ते 20 लाख स्टॅम्प विक्री केले जातात. यामुळे 15 ते 20 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
मुद्रांक विके्रते व दस्तलेखनिक यांच्या संपामुळे अनेक विद्यार्थी व नागरिकांना याचा तोटा झाला आहे. या संपामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या गैर सोयी झाल्या, तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा चालू असताना वेळात वेळ काढून आलेल्या विद्यार्थ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. बेमुदत संपामुळे विद्यार्थी व नागरिकांना याचा तोटा बसला आहे.
अखिल महाराष्ट्र स्टॅम्प व्हेंडर, बॉन्ड रायडर, पिटीशन रायटरर्स असोसिएशन तर्फ विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात आला आहे. सातारा जिल्हयात मुद्रांक विक्रेते केंद्र 15 आहेत. ती पुढीलप्रमाणे सातारा 2, कराड 3, फलटण 2, खटाव 1, कोरेगाव 1, खंडाळा 1, वाई 1, महाबळेश्वर 1, मेढा 1, दहिवडी 1, वडूज 1

0 Comments