नाथ मंदिरात तपासणी साठी जमलेले नागरिक
म्हसवड (धनंजय पानसांडे)
म्हसवड मध्ये सध्या सुरू आसलेल्या विविध साथीच्या रोगावर नियंञन आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग व म्हसवड नगरपालिकेच्या वतिने आज शहरात तिन ठिकाणी आरोग्य तपासणीचे कॅम्प लावण्यात आले आसुन पाच सुपरवायझरच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे २० कर्मचारी आरोग्य विभागाचे २० कर्मचारी २० आशा स्वयंमसेविका असे ६० कर्मचारी २०टिमच्या मदतीने पालिका हद्दीतील गृहभेटी कंटेनर तपासणी पूर्ण झाली आसुन या तपासणीत ९ रूग्ण डेंग्यू तपासणीत आढळून आले आसुन त्याचे रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आसले तरी म्हसवड शहरावर गेले आठ दिवस जे विविध रोगाचे संकट होते त्याचे प्रमाण कमी झाले आसल्याची माहिती म्हसवड आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सावंत यांनी सांगितले
गेल्या दोन दिवसापूर्वी आ जयकुमार गोरे जिल्हा आरोग्य अधिकारी पवार जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई मुख्याधिकारी पंडित पाटिल आदीनी शहरातील आजारावर उपाय योजना करण्यासाठी म्हसवड आरोग्य केंद्रात तातडीची बैठक घेवून उपाय योजना करण्यासंबंधी बैठकीत आश्वासन दिले होते त्या प्रमाणे बैठकी नंतर सातारा येथील व माण तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य कर्मचारी आशा कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी याच्या टिम करून घरोघरी तापाचे आजारी रूग्णाचा सर्वेक्षण करून कंटेनर रिकामेकरून डांसाची उत्पत्ती थांबवण्यासाठी लोक काम करत होते तर पालिकेने ही डांस मुक्तीसाठी औषध फवारणी गटारी स्वच्छ झाडे झुडपे काढण्यासाठी कर्मचार्यां बरोबर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्वच्छता सभापती पाणी पुरवठा नियोजन सभापती यानी स्वता काम करत हाजेरी लावताना दिसत होते
गेले दोन दिवसात म्हसवड शहरातील ३९ खाजगी हॉस्पीटल मध्ये डेंग्यूचे २६ चिकुण गुणीया१४ मलेरियाचे ५ तर तापाच्या १ रूग्णाने उपचार घेतले होते तर म्हसवड शहरातील ९ रक्त लघवी तपासणी लॅब मध्ये गेल्या पाच दिवसात तपासणीसाठी आलेले डेंग्यूचे ३३ रुग्णांनी तपासणी केली तर चिकुण गुणीयाच्या १३ रूग्णांनी तपासणी केली मलेरियाचा एक हि रूग्ण आढळून आला नाही
जया ठिकाणी पाणी साठा आहे माञ तो खाली करता येत नाही असा ठिकाणी गप्पी मासे सोडणयात आले आहेत आज पर्यंत २०१८ गप्पी मासे सोडण्यात आले आहेत
आज लावण्यात आलेल्या तिन ठिकाणी तपासणी केंद्रात साडे तिनशे नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली या तपासणीत पथकात डाॅ पाटिल ए एस डाॅ. ए बी तोडकरी डाॅ प्रथमेश ढमाळ यांनी तपासणी केली
गेल्या दोन दिवसांत जी आजाराची परिस्थिती होती ती काही प्रमाणात कमी आलेली दिसुन येत आसली तरी शहरातील रोगराई पूर्ण पणे संपल्या नंतरच तपासणी पथकाचे काम थांबवण्यात येणार आहे लवकरच या आजाराची धार कमी होणार आहे असे वैद्यकीय अधिकारी डाॅ सावंत यांनी सांगितले

0 Comments