म्हसवड- शहरात साथीच्या रोगाचा फैलाव वाढु लागल्याने पालिकेने बंद गटारी स्वच्छता मोहीम सुरु केली.
म्हसवड (धनंजय पानसांडे )
डासांपासुन शहरात उद्भवलेल्या साथीच्या रोगावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा व पालिकेने संयुक्त मोहिम राबवत तातडीने उपाययोजना सुरु केल्या असुन आरोग्य विभागाने तीन वैद्यकीय अधिकारी जादा कमॅचारी पॅथालाजिस्ट अतिरिक्त नेमणूक करत विविध वीस पथके तैनात करुन शहरात घर टू घर जावून तपासणी केली.
गत पंधरा दिवसापासून साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने शहर व परिसरात रुग्णांची संख्या दिवसे न दिवस वाढत असून ओंकार शिंदे या मुलाचा बळी गेल्यानंतर शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असताना काल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आ.जयकुमार गोरे जिल्हि आरोग्य अधिकारी भगवान पवार जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ यांनी भेट देऊन साथ आटोक्यात आणण्यासाठी सुचना देऊन जादा कमॅचार्यांची नेमणूक करुन वीस पथके शहरात विविध भागात पाठवून घरो घरी जावून सांधेदुखीचे तापाचे रुग्ण कोण आहेत का ? या तपासणी पथकांने तपासणी केली.प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णासाठी स्पेशल कॅम्प लावून रुग्णांची रक्त तपासणी औषध उपचार सुरु केल्याने गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.

पालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.चिकुणगुण्या,डेंगू ,मलेरिया या सोबतच तापाची साथ व त्वचेचे विकाराने ग्रस्त रुग्णांची वाढत चाललेली संख्या, येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी होत असलेली गर्दी,व शहरातील स्वच्छताबाबत नागरिकांच्या तक्रारीवर सामोपचाराने उपाययोजना करण्याबाबत येथील पालिकेच्या सभागृहात निमंत्रित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष भगतसिंह विरकर, पालिका उपाध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी, नगरसेवक शहाजी लोखंडे,गणेश रसाळ, धनाजी माने,अकिल काझी,माजी नगराध्यक्ष विजय धट,युवराज सुर्यवंशी,पृथ्वीराज राजेमाने, इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थित पालिका दुकान गाळेधारकांनी तुंबलेल्या गटर्सची वेळेत स्वच्छता व उपाययोजना बाबत गा-हाणे मांडले. पालिकेची कचरा गाडी,व कचरा वाहतुकीच्या वेळा, प्लॅस्टीक कचरा विल्हेवाट बाबतही उपाययोजना बाबत चर्चा झाली.या चर्चेत
कांतामामा रसाळ, सचिन देशमाने,बंटी खाडे,रफिक तांबोळी,इ इत्यादी व्यापा-यांनी भाग घेतला.
उपस्थितांच्या तक्रारीचे निवारणाबाबत मुख्याधिकारी पंडित म्हणाले, शहरातील गटारी,रस्ते,कचरा साठुन राहत असलेली ठिकाणे तातडीने स्वच्छ करण्याची कामे युध्द पातळीवर सुरु केलेली आहेत मुख्य व्यापार पेठेतील बंद गटारी उघडी करुन त्यामधील कचरा काढुन स्वच्छ केली जात आहेत पालिका कर्मचारी व सफाई कामगार सोबत नगराध्यक्ष व नगरसेवकही या स्वच्छता उपक्रमात उपस्थित राहुन मदत करत आहेत.वाहतुकीस अडथळा करणारी मुख्य व्यापार पेठेतील गटारीवर बांधकाम केलेले कठडे तातडीने काढुन टाकण्याबाबत संबंधितांना पालिकेच्यावतीने सुचना दिल्या जातील त्याचे पालन केले गेले नाहीतर पालिका गटारीवरील व त्यानजिकची सर्व कठड्याची बांध कि मे पाडुन टाकण्याबाबतची कारवाई मी स्वत: उपस्थित राहुन करेन असे ठोस आस्वासनही श्री.पंडित यांनी या बैठकीत दिले. यावेळी,गणेश रसाळ, स्नेहल सूर्यवंशी कांतामामा रसाळ, सचिन देशमाने, अकाल काझी,विजय धट, इत्यादींनी चर्चेत भाग घेऊन सुचना केल्या

0 Comments