विजय वाटेगावकर यांचे काम कौतुकास्पद- नगराध्यक्षा रोहिणी शिंदे
कराड - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने सहभाग नोंदवला असून यामध्ये अनुषंगिक कामे करणे करिता होणारे संभाव्य खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
४ जानेवारी २०१८ पासून सर्वेक्षण सुरू होणार आहे.देशभरातील ४ हजार ४३ शहरांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. सर्वेक्षण कार्यपद्धती, सेवा स्तरावरील प्रगती, संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता व हागणदारी मुक्तता, माहिती शिक्षण संवाद आणि वर्तनातील बदल, क्षमता बांधणी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ट कार्य, स्वतंत्र प्रमाणीकरण, प्रत्यक्ष निरीक्षक, नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा पद्धतीने कराडमधील नगरपालिका लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांच्या सहभागाने काम करावयाचे आहे.अशी माहिती विजय वाटेगावकर यांनी दिली.
आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर म्हणाले स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत कराड नगरपरिषद सहभागी होत असून सदरची स्पर्धा ४ हजार गुणांची आहे त्यापैकी कमीतकमी ३८०० गुण मिळवणे आवश्यक आहे.सदरची स्पर्धा यापूर्वी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रामाणिक प्रयत्न केल्याने कराड नगरपालिकेने राज्यपातळीवरील बक्षिस मिळविले आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याला कराडकर नागरिक व सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा व आपला सहभाग नोंदवावा.
कराडमधील नागरिकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन विजय वाटेगावकर म्हणाले, कराडमधील काही सोशल मीडियावरुन काही सूचना केल्या जातात त्या स्वागतार्ह आहेत. पण आता Play store मधून swachhata अॅप डाउनलोड करावा, आणि यामधून सूचना, तक्रारी कराडकर नागरिकांना करता येतात. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कराडकरांनी सहभाग घ्यावा आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहनही विजय वाटेगावकर यांनी यावेळी केले आहे.
आरोग्य समितीचे काम कौतुकास्पद - नगराध्यक्षा रोहिणी शिंदे
कराड शहरांमध्ये आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर आणि सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवक उत्कृष्ट काम करतात. आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजन आहोत, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही नगराध्यक्षा रोहीनी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. स्वच्छ अभियानात नगरपालिका व नगरवासीय कोठेच कमी पडणार नाहीत, स्वच्छ कराड, निरोगी कराड हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहू या, सर्वांच्या प्रयत्नाने या अभियानात कराड नगरपालिका महाराष्ट्रात नंबर वन ठरेल असा विश्वास नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केला.

0 Comments