वाई
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणा-या वाई तालुक्यातील सात ग्रामपंचतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसची पिचेहाट झाली असून भाजप व सेनेने दमदार मुसंडी मारली असून तर कॉग्रेसने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला समजला जाणा-या गटातील वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची सत्ता असणा-या कवठे व पांडे या गावांचे निकाल धक्कादायक लागल्याने महत्वाचे बुरूज ढासळल्यासारखी परस्थिती राष्ट्रवादीची झाली आहे. या दोन्ही गावांमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीचा कॉग्रेस व शिवसेनेने त्याचा फायदा उचलला असल्याचे चित्र सध्या या निकालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला वाई तालूक्यात आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. तसेच काही महिन्यापुर्वी कारखान्याचे उपाध्याक्ष गजानन बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने किकली येथे भाजपचा विजयाचा झेंडा रोवला तर काळंगवाडी येथे भाजप व कॉग्रेंसची युती झाल्याने सरपंच पदासाठी समान मते मिळाल्याने चिटट्ीची साथ भाजपला मिळाली तर उपसंरपच पद कॉग्रेसच्या पारडयात पडले. तर गोवेदिगर मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारून ही राष्ट्रवादीने सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळावले. भुईंज हा कॉग्रेसचा बालेकिल्ला आहे. मदन भोसले, गजानन भोसले व माजी सरपंच अनुराधा भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यात त्यांना आपला गढ साबूत राखण्यात यश आले. कॉगेेसची विचारधार असणा-या बोपर्डीत राष्ट्रवादीने वर्चस्व सिध्द केले आहे.
वाई तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय निवडून आलेले सरपंच भुईंज - पुष्पा अर्जुन भोसले (कॉगे्रस) मिळालेली मते 2695, कवठे - श्रीकांत किसन वीर (कॉगे्रस) 1032, पांडे - रेखा जितेंद्र जाधव (शिवसेना)612, बोपर्डी- प्राजक्ता सुनिल वनारसे(राष्ट्रवादी)1064, किकली- धनंजय बाळकृष्ण बाबर (भाजप)875, काळंगवाडी - रोहिदास प्रल्हाद गायकवाड (भाजप)364, गोवेदिगर- यशवंत नामदेव पिसाळ(राष्ट्रवादी)298 इत्यादी विजयी सरपंच पदाचे उमेदवार आहेत.

0 Comments