Hot Posts

6/recent/ticker-posts

सुरेंद्र गुदगेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार


मायणी :-
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मायनी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या विचारांच्या मातोश्री सरुताई विकास पॅनेल गटाने तब्ब्ल ४० वर्ष ग्रामपंचायत ताब्यात असलेल्या सुरेंद्र गुदगे यांच्या स्व भाऊसाहेब गुदगे ग्रामविकास पॅनल चा १० -७ असा पराभव करीत थेट सरपंचपदाचे येळगावकर गटाचे उमेदवार स्व भाऊसाहेबगुदगे यांचे धाकटे  सुपुत्र सचिनभाऊ गुदगे यांनी आपलेच बंधू जि प सदस्य सुरेन्द्र गुदगे यांच्या गटाच्या दादासाहेब कचरे यांचा तब्ब्ल ५२८ मतांनी पराभव करून मायनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयश्री खेचून आणली . 

सर्वत्र सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा अबाधीत असताना मायणी गटाची धुरा असलेले सुरेंद्र गुदगे यांच्या तब्ब्ल ४० वर्षे ग्रामपंचायतीच्या विरोधात असलेल्या डॉ येळगावकर यांच्या गटाने पराभव केल्याने ४० वर्षानंतर संपूर्ण बहुमत मिळून सुरेंद्र गुदगे यांच्या बालेकिल्ल्याचा पराभव केल्याने भाजप पक्षाचा पाय भक्क्म रित्या मायणी येथे रोवला गेला आहे . 

वडूज येथील नूतन प्रशासकीय इमारतीत झालेल्या मतमोजणीत वॉर्ड क्रमांक एक ,पाच,व सहा येथील प्रत्येकी तीन प्रमाणे नऊ व वॉर्ड क्रमांक दोन मधील एक आशा दहा जागा जिंकत मातोश्री सरुताई विकास पॅनेलने थेट सरपंच पदही जिंकल्याने स्पष्ट बहुमत सिद्ध आहे . डॉ येळगावकर गटाचे सरपंच पदाचे उमेदवार सचिनभाऊ गुदगे व सदस्य पदाचे दहा उमेदवार विजयी घोषित झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून , डॉ येळगावकर व सचिनभाऊ गुदगे यांच्या नावाच्या विजयी घोषणा देऊन आणि सचिनभाऊ गुदगे यांचे चिन्ह असलेल्या शिट्ट्या वाजवून वडूज  परिसर दणाणून सोडला . 
मातोश्री सरुताई विकास पॅनल विजयी उमेदवार :-
थेट सरपंचपदाचे विजयी उमेदवार  सचिनभाऊ गुदगे 
वॉर्ड क्रमांक एकचे उमेदवार सुरज शिवाजी पाटील. अश्विनी अभिजित पाटील ,आशाताई रघुनाथ माने,,
वॉर्ड क्रमांक दोन विद्या दत्तात्रेय काबुगडे ,
वॉर्ड क्रमांक पाच विजय रामचंद्र कवडे , भारती  विजय देशमुख , आनंदराव यशवंत शेवाळे 
वॉर्ड क्रमांक सहा :- जगन्नाथ किसान भिसे ,मंदिरा विलास झोडगे ,उषा अनिल पाटोळे

काकूंच्या चेहऱ्यावर हसू व समाधान

गेल्या दीड वर्षांपासून गुदगे वाड्यात  स्व भाऊसाहेब गुदगे यांच्या निधनानंतर सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे या दोन भावांमध्ये  संघर्ष चालू होता,या संघर्षात स्व भाऊसाहेब गुदगे यांच्या पत्नी आपले धाकटे सुपुत्र सचिन गुदगे यांच्या पाठीशी ठाम उभ्या होत्या. या संघर्षात अर्बन बँक व जि प गटात एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभ्या असलेल्या सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे यांच्यात लढ्यात सुरेंद्र गुदगे यांनी दोन्ही निवडणुकीत बाजी मारली होती . परंतु मायणी ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेंद्र गुदगे यांची जादू चालली नाही व सचिन गुदगे हे थेट सरपंच पदी निवडून आल्याने अखेर  सचिन भाऊंना जनतेने न्याय दिला असे म्हणत त्यांच्या आई जयश्री गुदगे (काकू)यांना आनंदाश्रू अनावर झाले. भव्यदिव्य विजयी मिरवणूक गुदगे वाड्याजवळ आल्या नंतर जयश्री गुदगे(काकू)व सौ नीता सचिन गुदगे यांनी सचिन गुदगे यांचे औक्षण केले व जयश्री गुदगे (काकू)यांनी डॉ येळगावकर व सुरज पाटील यांनीही पेढा भरवला.

सुरेंद्र गुदगे गटाची मतदारांनी वाजवली शिट्टी.

डॉ दिलीपराव येळगावकरं ,सचिन भाऊ गुदगे ,सुरज दादा पाटील,शंकरराव माळी यांची जमली गट्टी,सुरेंद्र गुदगे गटाची मतदारांनी वाजवली शिट्टी.मतमोजणीच्या ठिकाणी सचिन गुदगे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी शिट्टीचा तुफानी गजर केला.

सुरेंद्र गुदगे गटाचे विजयी उमेदवार:-

       वार्ड क्र२ नदाफ पापलाल मन्सूर,वार्ड क्र३ जाधव अर्चना सयाजी,श्रीखंडे मनीषा गौरीहर,माळी गजानन सुभाष,वार्ड क्र ४पवार विनोद लक्ष्मण,पवार वैशाली श्रीरंग,माने रणजित बाबासो.

Post a Comment

0 Comments