सातारा, 16 ऑक्टोबर-
पेटा कायदा हटवा, बैलाला वाचवा या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरु असलेले राज्यव्यापी बैलगाडी चालक मालक संघटनेचे आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले. याप्रकरणी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेली शिष्टाई कामी आली.
आंदोलनाची माहिती मिळताच राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी रात्री 11.30 वाजता आंदोलनकर्त्याची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भेट घेवून त्यांची आपुलकीने चौकशी केली. पुन्हा सकाळी अधिकार्यांसमवेत आंदोलनस्थळी भेट देवून 24 आक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक घेण्याबाबतचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर बैलगाडी चालक मालकांनी आंदोलन स्थगित केले.
केंद्र सरकारसह राज्य शासनाने बैलगाडी शर्यत सुरू होण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करून बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात या मागणीसाठी राज्यातील बैलगाडी चालक व मालकांनी बैलासह बेमुदत उपोषण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले होते. पाजहल्याच दिवशी या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
आंदोलनकर्ते पै. आनंदराव मोहिते, हणमंतराव चवरे, राजूशेठ गिरीगोसावी, प्रताप झांजुर्णे, ब्रम्हा पैलवान व पदाधिकार्यांशी रात्री आणि रात्रीची चर्चा निष्फळ झाल्यानंतर पुन्हा सकाळी सकाळी 10 वाजता मंत्री सदाभाऊ खोत, पशुसंवर्धन आयुध, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदींनी आंदोलनस्थळी चर्चा केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने चांगला वकील देऊन बाजू भक्कम पध्दतीने न्यायालयात मांडली जाईल. यााजचकेचा निर्णय आपल्याबाजूने कसा होईल, यासाठी प्रयत्न केला जाईल. दिवाळीचा सण असल्याने बळीराजाने हे आंदोलन मागे घ्यावे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याशीही खोत यांनी संपर्क साधून दि. 24 रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

0 Comments