Hot Posts

6/recent/ticker-posts

चेतना सिन्हा 'कौन बनेगा करोडपती "कार्यक्रमात


म्हसवड दि (प्रतिनिधी)
 येथील माण देशी फाऊंडेशन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा या सोनी टी व्ही प्रस्तुत  'कौन बनेगा करोडपती ? " या कार्यक्रमात शुक्रवार  दिनांक २०/१०/२०१७ रोजी रात्री ०९:०० वा. अमिताभ बच्चन  सोबत 'कौन बनेगा करोडपती ? " कार्यक्रमात खेळणार आहेत . 
सातारा जिल्ह्यातील पहिली महिला केबीसी च्या हॉट सिट पाहण्यास व अनुभवण्यास मिळणार आहे.माण देशी बँक व माण देशी फाऊंडेशन च्या माध्यमातून श्रीमती चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोठे काम केले आहे.माणदेशी महिला उद्योजिका निर्माण करणे हा त्याचाच एक भाग आहे.माण तालुक्यातील महिला सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे मोठे काम त्यांनी या माध्यमातून केले आहे.
          सोनी टी. व्ही.वरील "कौन बनेगा करोडपती " या प्रसिद्ध कार्यक्रमाने श्रीमती चेतना सिन्हा यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.हा कार्यक्रम शुक्रवार  दिनांक २०/१०/२०१७ रोजी रात्री ०९:०० वा. आहे.

Post a Comment

0 Comments