संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील शिरवळ व असवली ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले . शिरवळमध्ये महाआघाडीतून ' कमळ ' फुलले, तर असवलीत सोनबाबापू ढमाळ विकास आघाडीने सरपंच पदासह सहा उमेदवार विजयी झाले. या निवडणूकीत थेट सरपंच निवडीत शिरवळला भाजपचा सरपंचपदी दमदार प्रवेश झाला.
खंडाळा पंचायत समितीच्या किसनवीर स्मारक सभागृहात दहा वाजता शिरवळ व असवली ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस तहसिलदार विवेक जाधव यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. चार टेबलवरून दोन्ही गावच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. शिरवळ येथे राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीचे नऊ सदस्य निवडून आले मात्र सरपंचपदी भाजप आघाडीच्या परिवर्तन पॅनेलच्या लक्ष्मी सागर पानसरे निवडून आल्याने राष्ट्रवादीची ' गड आला पण सिंह गेला ' अशी अवस्था झाली . असवली येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांच्या जननीदेवी विकास आघाडीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले .विरोधी राष्ट्रवादी औदयोगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ यांच्या सोनबा बापू ढमाळ विकास आघाडीने सरपंच पदासह सहा जागी विजय मिळवित सत्ता परिवर्तन केले . असवलीच्या सरपंचपदी मनिषा दीपक ढमाळ या निवडून आल्या . तालुक्यात राष्ट्रवादी अंतर्गत सुरु असलेल्या कुरघोडयांमुळे राष्ट्रवादीला सत्ता गमावण्याची वेळ आली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
असवली येथे राष्ट्रवादी अंतर्गत दोन गटात हि निवडणूक झाली. यामध्ये बंडू ढमाळ गटामध्ये सरपंच पदाच्या उमेदवार मनिषा दिपक ढमाळ ( 987 मते ), तर दत्तानाना ढमाळ यांच्या गटाच्या मनिषा सचिन ढमाळ ( 924 मते ) यांनी मिळाली. त्यामध्ये दत्तानाना ढमाळ गटातील सरपंच पदाच्या उमेदवार 63 मतांनी पराभूत झाल्या. प्रभाग व विजयी उमेदवार, कंसात मिळालेली मते - प्रभाग- एक - लक्ष्मण ( पोपट ) माने -( 4O5), गणेश संभाजी ढमाळ ( 392), रेश्मा दत्तात्रय ढमाळ ( 3 89 ), प्रभाग दोन - नवनाथ विजयराव ढमाळ ( 399 ), शहनाजबी सय्यद ( 38 O ), माया शरद ढमाळ ( उ50 ), प्रभाग तीन - उत्तम भाऊसाहेब संकपाळ ( 36O ), माया दिपक रणपिसे ( 367 ), लता शंकर ढमाळ ( 365), हे विजयी झाले. प्रभाग एक व दोन मध्ये बंडू ढमाळ यांच्या गटाने सहा जिंकल्या तर प्रभाग तीन मध्ये दत्तानाना ढमाळ गटाने तीन जागा जिंकल्या आहेत.
शिरवळ येथे राष्ट्रवादी प्रणित शिरवळ शहर विकास आघाडी, व भाजप प्रणित सर्व पक्षीय परिवर्तन विकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत झाली. या लढतीमध्ये भाजपने सरपंच पदासह एक, राष्ट्रवादीला नऊ, शिवसेना तीन तर राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले तीन व अपक्ष एक उमेदवार निवडून आले.. यामध्ये सरपंच पदी भाजपच्या लक्ष्मी सागर पानसरे या चार हजार तीनशे बेचाळीस मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वातीताई बरदाडे ( 1137 ) मते, राष्ट्रवादीच्या अस्मिता आदेश भापकर ( 3O9O ) यांचा दारुण पराभव केला. प्रभाग निहाय विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढील प्रमाणे - प्रभाग एक - सचिन पांडुरंग राऊत ( 665 मते ), विकास हेमंत तांबे( 9O7 मते ), ममता अमृत पिसाळ ( 668 मते ), प्रभाग दोन -दत्तात्रय लक्ष्मण रांगोळे ( 615 मते), संगिता शंकर निगडे ( 684 मते ), प्रभाग तीन -दिलीप ज्ञानोबा गुंजवटे ( 552 मते ), राधिका चेतन बेलापूरकर ( 742 मते ), रुपाली विजय गिरे ( 95O मते ), प्रभाग चार - महेश महादेव जाधव ( 625 मते ), सुनिल दत्ताजीराव देशमुख ( 724 मते ), मंगल सतिश क्षिरसागर ( 345 मते ), प्रभाग पाच - संतोष सुभाष खुडे ( 4O2 मते ), ज्योती दिपक चव्हाण ( 329 मते ), कविता चंद्रकांत माने ( 653 मते ), प्रभाग सहा - प्रकाश सुखदेव परखंदे ( 729 मते ), आशा बाळासाहेब कारळे ( 82O मते ), रिजवाना समीर काझी ( 652 मते ), मिळवून विजयी झाल्या. दरम्यान आर.पी. आय. च्या अंतर्गत बंडाळीमुळे प्रभाग पाचमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. तर प्रभाग सहा मध्ये राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांनी घवघवीत यश मिळवित विजय संपादन केला.विजयी उमेदवारांची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी शिवाजी मरबळ, व कोंडके यांनी केली. सकाळपासून पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवाला होता. तर निकालानंतर शिरवळमध्ये जल्लोषी विजयी मिरवणूक निघाली होती.

0 Comments