वरकुटे मलवडी येथील सरपंच पदाचे उमेदवार बाळकृष्ण दत्तात्रय जगताप यांना १६२८ मते मिळाली. ५१४ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय बाळासाहेब जगताप यांना १११४ मते मिळाली. तर कुमार हरिबा गुरव यांना ५५ मते मिळाली, माणीक दशरथ जगताप यांना ३० मते मिळाली. तर कांतीलाल ठोंबरे यांना १० मते मिळाली. त्याबरोबरच सदस्यांच्या चुरशीच्या निवडणूकित ९-२च्या मोठ्या फरकाने मुसंडी मारीत भाजपने सत्तांतर साधले.काँग्रेस पक्षाची पंन्नास वर्षाची सत्ता मोडीत काढली.
माण तालुक्यात संवेदनशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या वरकुटे मलवडीत प्रथमच थेट सरपंच पदासाठी वेगळ्या झालेल्या निवडणुकीत एकंदरीत पाच उमेदवार सरपंच पदासाठी उभे राहिले होते. परंतु भाजपचे बाळकृष्ण जगताप आणि काँग्रेसचे संजय जगताप यांच्यातच प्रामुख्याने लढत झाली. यामध्ये बाळकृष्ण जगताप यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय जगताप यांंचा मोठ्या फरकाने पराभव केला.दोन्ही कुटुंबात राजकीय निवडणूकितील संजय जगताप यांचा ग्रााामपंचायत निवडणूकित सलग तिसरा पराभव मानला जात आहे.
बाळकृष्ण जगताप आणि भाजपचे नेते,जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी एकत्रितपणे ग्रामपंचायत निवडणूक लढवीत घवघवीत यश मिळविले.
आ.जयकुमार गोरे यांनी वरकुटे मलवडीची ग्रामपंचायत निवडणूकीला प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ देवून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.त्यामुळे माण तालुक्यात वरकुटे मलवडीच्या ग्रामपंचायत निवडणूकिच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिग्गज नेत्यांना मागे टाकून ७-४च्या फरकाने निवडणूक जिंकली होती.परंतु यावेळी अनिल देसाई यांनी भाजपच्या माध्यमातून केलेली घोडदौड आणि बाळकृष्ण जगताप यांनी सुस्वभावातुन साधलेला जनसंपर्कच विजयास कारणीभूत ठरला आहे.
वाँर्ड क्र १ चे विजयी उमेदवार सौ.आशा खाशेराव चव्हाण ४५७ मते मिळाली, सौ.सुनिता दादा मंडले यांना ४१२ मते मिळाली, अँड.सतिश सिताराम जगताप यांना ४६८ मते मिळाली.
वाँर्ड क्र.२चे विजयी उमेदवार सौ. वंदना विजयकुमार नरळे ४५३ मते मिळाली, करिम बादशहा ईनामदार यांना ५८२ मते मिळाली.
वाँर्ड क्र.३चे विजयी उमेदवार श्रीमती रतन मधुकर वाघमोडे यांना ४३८ मते मिळाली, रमेश यशवंत खरात यांना ३९० मते मिळाली,दिलीप बापु खरात याना ३८७ मते मिळाली,
वाँर्ड क्र.४चे विजयी उमेदवार सौ.वंदना सुरेश यादव यांना ३६८ मते मिळाली,दत्तात्रय मारूती बनसोडे ३९८ मते मिळाली,रूकसाना आयुब मुल्ला यांना ३४८ मते मिळवून विजयी झाल्या.

0 Comments