Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल जाहिर..


पाटण / प्रतिनिधी
पाटण तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका लागल्या होत्या त्यातील १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आणि उर्वरित ७० ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी शिरळ येथील शासकीय गोडाऊन मध्ये सुरळीत पार पडल्याची माहिती पाटण चे तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी रामहरी भोसले यांनी दिली.
         सोमवार दिनांक १६ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान होणार असून यासाठी २१८मतदान केंद्रे  असून  १३९० मतदान अधिकारी व कर्मचारी नेमले होते .तसेच २४० पोलीस कर्मचारी नेमण्यात आले असून मतदानासाठी २१८  ई व्ही एम मशीन आणि २४५ कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आले होते.यामध्ये तालुक्यातील ३६मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरण्यात आली होती.
   यावेळी प्रथमच सरपंच पदासाठी थेट निवडणुक घेण्यात आली. एकाच मशीनवर सरपंच व सदस्य याची मतपत्रिका ठेवण्यात आली होती.सरपंच पदासाठी निळा रंगाची  मतपत्रिका असून अनुसूचित जाती साठी फिका गुलाबी,नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा आणि सर्वसाधारण साठी पांढरा रंगाची मतपत्रिका होत्या
    दरम्यान मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी १०वाजलेपासून शिरळ येथील शासकीय धान्य गोदामाच्या इमारतीत  मतमोजणीला प्रारंभ झाला असून यामध्ये मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या.
पहिल्या फेरीत
नाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद हे शिवसेनेच्या मनिषा संपत कदम यांच्या कडे आले असून ग्रामपंचायतीचे सत्तांतर होऊन राष्ट्रवादी कडून शिवसेने कडे सत्तांतर झाले, गोकुळ तर्फ हेळवाक ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादी चे सरपंच रमेश बंडू कदम झाले असून ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ६ व शिवसेनेच्या ५, येराड ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे परिस्थिती राहिली असून ग्रामपंचायतीवरती शिवसेची सत्ता कायम राहिली असून शिवसेनेचे प्रकाश मारूती साळुंखे तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ८ व राष्ट्रवादी १ असे सदस्य झाले, काठी गावामध्ये सरपंच राष्ट्रवादी  जगन्नाथ बाबुराव शेळके तर ग्रामपंचायत राष्ट्रवादी कडे,निवडे ग्रामपंचायत मध्ये सरपंच राष्ट्रवादी चे रामचंद्र कृष्णत शिंदे तर ग्रामपंचायत शिवसेनेकडे ८ व राष्ट्रवादी १०, वेखंडवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद रिक्त असून शिवसेनेचे सत्तांतर होऊन राष्ट्रवादी कडे ग्रामपंचायत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी कडे ३ व शिवसेनेचे २ सदस्य झाले आहेत, कोंजवडे  ,आवर्डे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद हे शिवसेनेच्या वनिता अधिकराव खामकर तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ५ व राष्ट्रवादी २, जळव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या शितल शरद कदम तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे ३ व राष्ट्रवादी चे २, कडवे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच शिवसेनेचे रविंद्र महकू सकपाळ तर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन शिवसेनेच्या ५ व राष्ट्रवादी चे ३, धायटी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे सरपंच संपत वसंतराव देशमुख तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ५ व शिवसेना २, नानेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून सरपंच राष्ट्रवादी चे नितीन सखाराम मसुगडे तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ५ तर शिवसेनेचे २, माजगाव ग्रामपंचायतीमध्ये  राष्ट्रवादी चे सरपंच प्रमोद शिवाजीराव पाटील तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ३ व राष्ट्रवादी चा ५, शिवदंश्वेर ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती असून सरपंच शिवसेनेचे लाड आवळाराम यशवंत तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादी चे २, नाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून शिवसेनेच्या सरपंच मनिषा संपत कांबळे झाल्या आहेत, कोंजावडे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून शिवसेना चे सचिन लोहार हे सरपंच झाले आहेत, कोजांवडे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून सरपंच राष्ट्रवादी चे सचिन मोहनराव लोहार, शिरळ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे सरपंच हणमंत सुर्यवंशी झाले आहेत, ढोरोशी ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे परिस्थिती असून राष्ट्रवादी चा नलिनी महेंद्र मगर या सरपंच झाल्या आहेत, मणेरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून शिवसेनेचे बाबर विजय राघू हे सरपंच झाले आहेत, निवकणे ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती आहे राष्ट्रवादी चा अर्चना प्रकाश पाटणकर या सरपंच झाल्या आहेत तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ४ व शिवसेनेच्या ३ उमेदवार निवडून आले आहेत.
दुसऱ्या फेरीत
भारसाखळे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे सरपंच आशा विठ्ठल पवार तर ग्रामपंचायत राष्ट्रवादी ६ व शिवसेना १,  हेळवाक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शिवसेनेच्या शैला सखाराम कदम तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ४ व शिवसेनेच्या ३, तोंडोशी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच सागर एकनाथ संपकाळ तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे ५ व शिवसेनेच्या २, झाकडे सत्तांतर होऊन शिवसेने कडून राष्ट्रवादी कडे ग्रामपंचायत गेली सरपंच राष्ट्रवादी चा  सुजाता विलास देशमुख, जाळगेवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच शिवाजी बबन काटे तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ८ व राष्ट्रवादी ०, मारूल तर्फे पाटण ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच सुदर्शन वाईकर तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादी २, बनपेठवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच आबासाो आनंदा साळंुखे तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ५ व राष्ट्रवादी चा २, रासाटी ग्रामपंचायतीमध्ये २० वीस वर्षांनंतर सत्तांतर झाले असून सरपंच राष्ट्रवादी चा सुरेखा बंडू कदम, पाडळोशी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सत्तांतर होऊन राष्ट्रवादी कडे सत्तांतर झाले सरपंच राष्ट्रवादी चे शिवाजी तानाजी पवार, राहुडे ग्रामपंचायतीचे सत्तांतर झाले असून शिवसेनेचे सरपंच तुषार विजय चव्हाण, काडोली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे सरपंच पटेल हसिअली हसन, कडवे बु. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच राष्ट्रवादी चा अलका शशिकांत गुरव तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या २ व राष्ट्रवादी ७, उरूल ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या सरपंच वैशाली संग्राम देसाई तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ६ व राष्ट्रवादी ३, घोट ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती राहिली असून सरपंच शिवसेनेचे आरेकर मधुकर बंडू तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ६ व राष्ट्रवादी ३,  मरळोशी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या सरपंच खाशीबाई घाडगे तर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन शिवसेनेने एक हाती सत्ता घेतली, धडामवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे सरपंच हणमंत खाशाबा कदम तर ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती राहिली आहे, भुडकेवाडी ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती राहिली असून सरपंच पद शिवसेनेच्या संध्या भिमराव मोरे, कुसवडे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी चे मिसाळ इंदुबाई हणमंत या सरपंच झाल्या आहेत, नुने ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून सरपंच पद शिवसेनेच्या आबासाहेब कुंभार हे झाले आहेत, ढाणकल ग्रामपंचायती मध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी चे  सरपंच शंतनु हरिष भोमकर झालेले आहेत. 
तिसर्या फेरीमध्ये
जाधवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद रिक्त असून ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे ३ व शिवसेनेच्या २ जागा मिळवल्या, शेडगेवाडी जैसे थे स्थिती असून राष्ट्रवादी चे सरपंच संतोष कृष्णत शेडगे तर राष्ट्रवादीचे ८ व शिवसेनेच्या १, सडावाघापूर ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती असून सरपंच राष्ट्रवादी चा अनिता बापू दंडिले तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे ३ व शिवसेनेच्या १, वेताळवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच सुभाष पांडुरंग नलवडे तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादी चा १, डावरी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे  सरपंच बाबुराव पाटील तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ६ व राष्ट्रवादी चे १, नाडे ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती शिवसेनेचे सरपंच विष्णू पवार व ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ८ व राष्ट्रवादी चे १ सदस्य, म्हावशी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे बंडखोर उमेदवार सरपंच शंकर बाबुराव घाडगे झाले आहेत, साईकडे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चा सरपंच वंदना एकनाथ पाटील तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ५ विजयी  राष्ट्रवादी चे एकही उमेदवार विजयी झालेले नाही, गलमेवाडी ग्रामपंचायतीमध्ये क्रॉगेंस चे सरपंच जितेंद्र हणमंत चोरगे तर ग्रामपंचायतीवरती शिवसेनेचे सत्तांतर होऊन क्रॉगेसची सत्ता आली आहे, ढेबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे सरपंच विजय दत्तात्रय विगावे तर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चे ५ शिवसेनेच्या ३ व टाय १ असे सदस्य आहेत ,  चौगुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शिवसेनेचे रविंद्र मारूती भुटल ग्रामपंचायत क्रॉंगेसकडून शिवसेने कडे सत्तांतर, डेरवण ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती सरपंच पद शिवसेनेच्या आशाताई आकाराम यादव, अडूळपेठ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच विनायक वसंत शिर्के तर ग्रामपंचायत शिवसेनेच्या २ व राष्ट्रवादी चे ५, नाटोशी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शिवसेनेचे अविनाश गंगाराम कुंभार तर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या १० व राष्ट्रवादी चे २, गारवडे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी चा सरपंच छाया रामचंद्र गुरव गारवडे ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर, बनपुरी ग्रामपंचायती मध्ये जैसे थे स्थिती असून सरपंच राष्ट्रवादी चा नर्मदा कुंडलिक कुंभार यांचाकडे, सणबुर ग्रामपंचायतीमध्ये जैसे थे स्थिती असून सरपंच राष्ट्रवादीचा अनिता अशोक चव्हाण झाल्या आहेत, कारळे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून शिवसेनेच्या पाटील वनिता जालिंदर या सरपंच झाल्या आहेत.
चौथ्या फेरीमध्ये
दाढोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून सरपंच अंजिराबाई पांडुरंग डांगे राष्ट्रवादी चा सदस्य निवडून आलेल्या आहेत, बिबी ग्रामपंचायत राष्ट्रवादी सरपंच- रविंद्र विष्णू विभुत्ते. राष्ट्रवादी- ९ शिवसेना-0, निसरे ग्रामपंचायत राष्ट्रवादी सरपंच- शारदादेवी शंकरराव जाधव, आबदारवाडी ग्रामपंचायत शिवसेना सरपंच- विजय विष्णू शिंदे, मारूल हवेली ग्रामपंचंयत राष्ट्रवादी सारंग पाटील गट सरपंच- अशोक दिनकर मगरे. राष्ट्रवादी सदस्य- १०, शिवसेना १, बहुले ग्रामपंचायत राष्ट्रवादी सरपंच- सुजाता रामचंद्र पवार. राष्ट्रवादी सदस्य- ८, शिवसेना-१, हुंबरवाडी ग्रामपंचायत शिवसेना सरपंच- निवास सखाराम लाड, ताईगडेवाडी ग्रामपंचायत सरपंच- शोभा संजय लुगडे, मराठवाडी ग्रामपंचायत सरपंच राष्ट्रीय कॉंग्रेस सरपंच- तेजस्वीनी जयवंत सुतार, सदस्य कॉंग्रेस-४, राष्ट्रवादी- ३, मालदन ग्रामपंचायत सरपंच राष्ट्रवादी- भिमराव शामराव गायकवाड, शेडेंवाडी ग्रामपंचायत सरपंच- विद्या सुभाष मोरे, डिगेवाडी ग्रामपंचायत सरपंच राष्ट्रवादी- मोहन बाबुराव डिगे, अडुळ गावठाण ग्रामपंचायत सरपंच शिवसेना- जयवंत रामचंद्र केंडे, सदस्य राष्ट्रवादी-५, शिवसेना-२. घोटील ग्रामपंचायत जैसे थे स्थिती  सरपंच राष्ट्रवादी- रामचंद्र जाधव.

Post a Comment

0 Comments