Hot Posts

6/recent/ticker-posts

दाल में कुछ काला नही, तुम्हारी नियत मे खोट है-- वसंत लेवेः


खासदार उदयनराजे भोसले जाणते झाल्यावर,त्यांचे राजकिय, सामाजिक आणि कौटुंबिक खच्चीकरण कसे होईल हेच ज्यांनी सातत्याने बघीतले, तसेच 1999 साली तर उदयनमहाराजांना फाशीच व्हावी असा डाव टाकणा-या उदयनमहाराज यांच्या काकांची कुकारनामे जगासमोर उघड झाल्यानेच त्यानंतर काकांना पक्षाचे सर्वेसर्वा यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात कधीच स्थान दिले नाही. आनंदीबाई आहे म्हणणारे, राघोबादादा नाहीत असं म्हणतात, परंतु आनंदीबाई असेल तर राघोबादादा अपरिहार्यपणे असणारच. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुस-यांचा वापर करणा-या, तुमच्यासारख्या भेकड लोकांच्या घरामध्येच आनंदीबाईसह राघोबादादांचा निवास होता. दाल मे तो कुछभी काला नही था, दाल तो साफ-सुथरी है, मगर तुम्हारी नियत मे जरुर खोट है अशा खरमरीत शब्दात साविआचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती वसंतअण्णा बबनराव लेवे यांनी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

वसंत लेवे यांनी आज दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, ज्या ज्यावेळी कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे असे आरोप होतात त्यावेळी कारखान्याचं तुणंतुणं बंद करा, तुम्ही एकही संस्था काढली नाही, तुम्ही काही सांगु नका एवढे एकच वाक्य तुम्ही वारंवार सांगता. तुम्ही ज्याला तुणंतुणं म्हणता, ते तुणंतुणं नसुन, शेतक-यांचा आत्मा असलेल्या संस्थेव्दारे भविष्यांत तुमचा वाजणारा बेंडबाजा आहे, तो तुम्हाला फार महागात पडणार आहे असा टोला देवून, वसंतअण्णा बबनराव लेवे यांनी पुढे म्हटले आहे की, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी स्वतःच्या नावाने, संस्था जरुर काढल्या नाहीत, तथापि शेकडो संस्था उभ्या करण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व योगदान दिले आहे, त्यामध्ये अपपरभाव त्यांनी कधीच केलेला नाही. संस्था काढुन, सभासद वर्गणी गोळा करुन, पुन्हा त्या सभासदांना फसवून, संस्था मोडीत काढण्याचे, तुमच्यासारखे पाप तरी उदयनराजेंनी कधी केलेले नाही. स्थापन केलेल्या संस्थांचा उपयोग, स्वार्थासाठी पाहीजे तसा उपयोग करुन घ्यायचा असा तुमचा उद्देश आहे. तसा उद्देश उदयनराजेंचा कधीही नव्हता. त्यामुळे कारखान्याचं तुणंतुणं नव्हे तर भविष्यातील हा बॅन्डबाजा तुम्हाला स्वस्थ झोपु देणार नाही. नुसता कारखाना नाही तर अजिंक्य बॅन्केचे काय वाटोळे तुम्ही केलेत ते जनतेने पाहीले आहे आणि भोगले आहे. अजिंक्य बझारचा कसा बाजार मांडला हेसुध्दा जनतेला माहीती आहे. कारखान्याच्या जागेमधील शेंद्रे येथील अजिंक्य रेस्टॉरंट कसे पॉलिटेक्नीक कॉलेज झाले, त्याबद्दल कारखान्याला फक्त 1 रुपया भुईभाडे दिले जाते, हे सुध्दा जनतेला माहीती आहे. जागा कारखान्याची आणि त्यावर कॉलेज तुमच्या शाहु अ‍ॅकॅडमीचे, आणि त्याबद्दल शेतकरी सभासदांना काय मिळतं तर काहीच नाही, हा असला सहकाराच्या नावावर धंदा तर आम्ही कधी केलेला नाही. दुसरा विषय घ्या म्हणणा-यांनी मार्केट कमिटी कशी विकून खाल्ली याची चौकशी सुरु आहे. मार्केट कमिटीच्या बैलबाजाराची जागा, दुस-यांना व्यापारी कारणाकरता विकून, खिंडवाडी येथील उदयनरमहाराजांच्या कुळांची जागा तुम्ही गिळंकृत करायला निघाला आहात. मार्केट कमिटीतही तुम्ही भ्रष्टाचारच केला आहे, भ्रष्टाचाराशिवाय तुम्हाला काही जमलंच नाही हेच याउदाहरणावरुन सिध्द होत आहे. तुम्ही तुमच्या संस्थांमध्ये भ्रष्टकारभार करुच नका, म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करणार नाही.

कारखान्यावरुन जाताना व येताना, राजमातांना किंवा कुणालाही पोटशुळ उठायचे कारणच नाही. कारखाना हा काही तुमचा किंवा तुमच्या पिताश्रींनी खाजगी उभारलेला नाही तर तो सहकारी तत्वावर उभारलेला कारखाना, सर्व सभासदांच्या सममालकीचा आहे. तसेच सातारा जिल्हयात फक्त तुमचाच एकमेव कारखाना नाही, त्यामुळे शेंद्रेच्या माळरानावरील केलेल्या तथाकथित नंदनवनाबद्दल राजमातांना किंवा उदयनमहाराज यांना आकस, तिरस्कार, व्देष वाटण्याचे काहीच कारण नाही. राजमाता दिल्लीत तळ ठोकून होत्या ते जिहे कठापूर कारखान्यासाठी. तुमचा कारखांना सुरु होवू नये म्हणून त्या तळ ठोकून होत्या हा, तुमचा तुम्ही तिरकसपणे लावलेला जावईशोध आहे.

स्थानिकांना काम मिळावे म्हणुन घंटागाडी आदोलनाला भेट देवून तुम्ही पाठींबा दिला, स्थानिक जर चांगले काम करीत नसतील तर सातारकरांना सक्षम पर्याय दयायला नको का1 सातारकरांचे सार्वजनिक आरोग्य अधिक चांगल्या पध्दतीने राखण्याचे नवीन प्रयोग, प्रयत्न करायचेच नाहीत का1 तुमचे उत्तर प्रयत्न करायचे नाही असे असेल तर तुमचे बुरसटलेले विचार तुमच्या पाशीच ठेवा, सातारकरांनी तुम्हाला घरी बसवले आहे असे तुम्हीच म्हणतात, आता भविष्यात सातारमधुनही हुसकावून लावतील अशी वेळ सातारकरांवर आणु देवू नका. राजमातांनी घंटागाडी आंदोलकांची आणि नगरपरिषदेची अश्या दोन्ही बाजु ऐकून घेवून, त्यामध्ये ज्यांचा- ज्यांचा मुद्दा चुकीचा होता अशा दोघांनाही परखड बोल सुनावले, त्यांच्या पारदर्शी आणि सत्याची बाजु घेण्याच्या प्रयत्नांना दाल मे कुछ काला है, असे म्हणणे म्हणजे, मर्यादेचे उल्लंघन असून, दाल तो साफ सुथरी थीः मगर तुम्हारे नियत बुरी निकलीः असेही वसंतअण्णा बबनराव लेवे यांनी म्हटले आहे.



शेंबडा राजा काही बोलला ते ऐकुन तोडपाण्याचे तुम्ही आरोप केले, शेंबडा राजाची पत ती काय1आणि शेंबडा राजाचे एैकून तुम्ही केलेले आरोप म्हणजे शेंबडया पोराने आरोप केल्यासारखे वाटतात. शेंबडा राजाचं ऐकुन आणि नुसते ऐकून नव्हे तर त्यावर अंध विश्‍वास ठेवून, तोडपाण्याचे सैरभैर आरोप तुम्ही केलेत, यावरुन, तुमची वैचारिक बुध्दी तुम्ही गहाण टाकल्याचे स्पष्ट होते. तुम्हाला जनहित नव्हे तर फक्त स्वार्थ आणि स्वार्थच साधायचा आहे असेच सुज्ञ सातारकर तुमच्या या वक्तव्याबददल एकंदरीत म्हणतील, जे झाले आहे ते झाले, आता मला आणखीन तोंड उघडायला लावू नका अशा इशा-यासह, शेलक्या शब्दात वसंत लेवे यांनी आमदार शिवेंद्रराजेंनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

Post a Comment

0 Comments