विजयराज झोडगेसत्यसह्याद्री वृत्तसेवा
कोणताही सण, उत्सव म्हटलं की ध्वनीप्रदूषण, डॉल्बी-डीजेचा दणदणाट असं समीकरणच होतं. परंतु, सातारा जिल्ह्यात पार पडलेला गणेशोत्सव व दुर्गोत्सव, शिव जयंती आदी कार्यक्रमांमधून हे गोंगाटाचं समीकरण बदलताना दिसलं. कर्णकर्कश्श डॉल्बी जाऊन सर्वत्र पारंपरिक ढोल-ताशांचा गजर घुमताना दिसला. ‘जुनं ते सोनं’, असणारी परंपराही सुरु झाली अन् या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना रोजगारही मिळाला. शिवाय कर्कश आणि आवाजाच्या नियमांची होणारी पायमल्लीही टळली आहे.
मायणी व परिसरातील उत्सव मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी व डीजे ला हद्दपार करत पारंपरिक ढोल ताशे लेझीम या वाद्यांचा स्वीकार केल्याचे दिसून आले. आधुनिक युगात पारंपरिकतेचा पुरस्कार केल्याने जेष्ठ नागरिक यांच्याबरोबरच येथील सर्वच स्तरातून सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे ढोल ताशे पथकांविषयी समाधान व त्यांचे कौतुक होत आहे .
खटाव तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या मायणी शहरात नाशिक ढोल पथके व अन्य पारंपरिक ढोल पथकाचा आदर्श घेत सध्या चार ढोल पथके निर्माण झाली आहेत . यातील सर्वच ढोल पथकातील कार्यकर्ते तरुण आहेत . कोणी बेरोजगार आहेत तर कोणी विद्यार्थी आहेत, आपल्या वैयक्तिक शालेय खर्च जमा व्हावा ही भावना असलेले हे तरुण सध्या कौटुंबिक जबाबदारीही खारीच्या वाटेने उचलताना दिसत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
डॉल्बी,डीजे मुळे वृद्ध लोकांना शाररिक व मानसिक त्रास होतो. त्याचबरोबर कानाचे विकार होऊन अकाली बहिरेपणा आल्याची उदाहरणे आहेत. त्याला या पारंपरिक वाद्यांमुळे अटकाव बसला असून डॉल्बी च्या आवाजाने बंद होणारे घराचे दरवाजे पारंपरिक ढोल ताशे ची लयबद्ध रचना ऐकण्यासाठी खुले होताना दिसून येत आहेत.
उत्पन्नही मिळाले अन् दृष्टिकोनही बदलला
आजच्या आधुनिक युगात पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण सध्या भारतात होताना दिसून येत आहे परंतु भारतीय संस्कृतीची भुरळ संपूर्ण जगाला पडत आहे. भारतीय संस्कृतीचाच एक पैलू म्हणजे ढोल-ताशे, लेझीम ही वाद्ये. याचा वापर शेकडो वर्षापासून भारतीय उत्सवात सर्रास केला गेला आहे . परंतु गेल्या काही वर्षपासून याचा विसर समाजाला पडलेला आढळतो आहे. आम्ही याचाच विचार करून ढोल ताशे पथकांची स्थापना केली व त्यामुळे उनाड,व बेरोजगारी युवकांना,विद्यार्थ्यांना दिवसभराच्या कामानंतर हक्काचे उत्पन्न मिळू लागले आहे . आणि समाजातील लोकांचा त्यांचेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक बनला आहे
- मृगेंद्र शिंदे, संस्कृत विषयाचे शिक्षक
व ढोल ताशे पथकाचे मार्गदर्शक.
संघटन, उर्जेचा वापर
युवकांना संघटित ठेऊन त्यांच्याकडील ऊर्जेचे योग्य वापर या क्षेत्रामध्ये होतो.एक हौशी प्रोफेशन म्हणून याकडे पाहिले जाते.युवकांच्या कामाचा समान मोबदला त्यांना दिला जातो.
-सुनील फल्ले.संभाजी
राजे ढोल ताशा पथक चालक
मायणी

0 Comments