सातारा
जिल्हा परिषद शाळा निपाणी येथील विद्यार्थी अंकित दुर्वास पवार (फुरुस) याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा सन 2017-18 मध्ये अंकित दुर्वास पवार (फुरूस) ह्या विद्यार्थ्यांने गोळाफेक मध्ये तिसरा क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल त्याचे ग्रामस्थांनी तसेच एस. मालुसरे गृपच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
जिल्हास्तरीय स्पर्धेतही तो हमखास यश मिळवेल असा विश्वास त्याच्या हितचिंतकांनी व्यक्त केला. त्याला त्याचे आई वडील, क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments