सत्य सह्याद्री वृत्तसेवा (फलटण):
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये कोणत्याही घटणेमागील वैज्ञानिक कारण समजून घेण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी या साठी सातारा जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण व मालोजीराजे शेती विद्यालय फलटण यांच्या संयुक्त विदयमाने दि. २८,२९,३० नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि. काॅलेज, जिंती नाका फलटण येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २८/११/२०१७ रोजी दुपारी २ वाजता आ. दिपकरावजी चव्हाण, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर,मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा. सौ. पुनिता गुरव, मा.श्री.आर. व्हि. निंबाळकर, मा.श्री. विजयसिंह जाधव व फलटण पंचायत समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी सर्व विज्ञान प्रेमी नागरीक , विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला व विज्ञान प्रदर्शन पहायला उपस्थित रहावे असे आवाहण काॅलेजचे प्राचार्य आगासर यांनी केले आहे.

0 Comments