शिवप्रताप दिनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतेवेळी एल के सरतापे विजय धट अबदागिरे सागर बाबर आदी
म्हसवड/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
छञपती शिवाजी महाराज यांच्या जय घोषाच्या आरोळ्यात मोठ्या उत्साहात म्हसवड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
म्हसवड येथील शिवजयंती उत्सव मंडळाचे व धर्मवीर संभाजीराजे उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश ( बाबा) माने यांनी शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून म्हसवड येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रंगरंगोटी करून पुरोहित पाठक यांच्या मंञोत्चाराने पुतळ्यास दुधाने अभिषेक घालण्यात आला त्यानंतर पञकार एल के सरतापे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी पञकार सागर बाबर माजी नगरसेवक बी.एम.अबदागिरे संजय टाकणे अनिरुद्ध वाळुजकर भाजपाचे मार्तंड गुरव यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन साजरा केला यावेळी अकाश माने सौरभ माने सुरेश गोंजारी अतुल राऊत अमोल गोंजारी दिग्विजय माने सयाजी माने आकाश कोळी रोहन माने सिध्देश्वर काटे सुरज जगताप नामदेव माने आदी उपस्थित होते

0 Comments