वडूज
येथील आरोग्य हॉस्पिटल येथे रविवार दि. 12 रोजी बालाजी ब्लड बँकेच्यावतीने सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक अतुल गायकवाड यांनी दिली.
या शिबिरात सहभागी होणार्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्र व रक्तगट कार्ड देण्यात येणार आहे. शिवाय रक्तदात्यास आयुष्यभरात कधीही रक्ताची गरज लागली तर जेवढे युनिट रक्त दान केले आहे तेवढे युनिट रक्त मोफत देण्यात येणार आहे. तसेच रक्तदात्याच्या मित्रपरिवारास रक्त लागल्यास सवलतीच्या दरात रक्त देण्यात येणार आहे.
रक्ताची कृत्रिमरित्या निर्मिती करता येत नाही आणि रक्तदान काळाची गरज असून जास्तीत जास्त दात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अतुल गायकवाड यांनी केले असून अधिक माहितीसाठी 9657216458 या क्रमांकावर संपर्क साधावा.

0 Comments