फलटण
दि. 07.11.17 रोजी जिल्हा ओ.बी.सी. संघटनेच्या वतीने फलटण तहसील कार्यालयावर "मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी व इतर सर्व मागण्यांसाठी" आंदोलन करण्यात आले. त्यावेळी फलटण तालुका ओ.बी.सी. संघटनेच्या कार्यकरणीची निवड झाली. अध्यक्ष पदी मा. श्री दिपक शिंदे यांची तर उपाध्यक्ष पदी मा. श्री निलेश चिंचकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लवकरच फलटण तालुक्यातील ओ.बी.सी. च्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन फलटण तालुका व शहर ओ.बी.सी. संघटनेच्या विस्तारीत कार्यकारिणीची निवड करून तालुक्यातील गाव, वाडा, वस्ती पर्यंत ओ.बी.सी. संघटनेचे विचार मांडून ओ.बी.सी. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले जाईल आणि खरया अर्थाने ओ.बी.सी. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेऊ असे प्रतिपादन नुतन अध्यक्ष मा. श्री दिपक शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा ओ.बी.सी. संघटनेचे अध्यक्ष मा.श्री भरत लोकरे, समता परिषदेचे मा.श्री दशरथ फुले, अरविंद राऊत,प्रकाश भोंगळे,प्रमोद क्षिरसागर,भिकाजी सुर्यवंशी,सावता बनकर,किशोर सरगर,प्रल्हाद शिंदे,टि.डी. शिंदे,अमिरखान मेटकरी, राजाभाऊ देशमाने, जोतिराम घनवट, भगवान कर्वे संह इतर ओ.बी.सी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments