Hot Posts

6/recent/ticker-posts

लोणंद येथे भारतीय संविधान दिवस साजरा


लोणंद
लोणंद फाउंडेशन, लोणंद व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोणंद यांचे वतीने बौद्ध विहार लोणंद येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.


याप्रसंगी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन गजेंद्र मुसळे व प्रा.अमीर इनामदार सर यांनी केले. 


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


भारतीय संविधान या विषयावर प्रा. अमीर इनामदार सर यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रम साजरा व यशस्वी करण्यासाठी लोणंद फाउंडेशन, लोणंद चे अध्यक्ष दयानंद (भाऊ) खरात, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार शशिकांत जाधव (बापू) , लोणंद फाउंडेशन चे खजिनदार सूनिलजी शहा, सचिव कय्युमभाई मुल्ला, सहसचिव राजाभाऊ खरात, मुख्य मार्गदर्शक गजेंद्र मुसळे, रविंद्र क्षीरसागर, राजुभाई कुरेशी, चंद्रकांतदादा जगताप, लक्ष्मी रोड नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक सुनील खरात (आण्णा साहेब ), तांबवे उपसरपंच विशाल शिंदे, संतोष खरात, रविंद्र खरात, निलेश खरात, दिपक बाटे, सतीश भिसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments