लोणंद
मालोजीराजे विद्यालय लोणंद येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) स्थापना दिनानिमित्त मालोजीराजे ज्युनियर कॉलेज लोणंद व लोणंद फाउंडेशन चे वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले यावेळी नुकतेच सैन्यदलात भरती झालेल्या जवान व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथजी लांडे साहेब, लोणंद मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर बुटीयाणी सर, शरदचंद्रजी पवार महाविद्यालय लोणंद चे नियोजन कमेटी सदस्य नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील, लोणंद फाउंडेशन चे अध्यक्ष दयानंदभाऊ खरात, उपाध्यक्ष डॉ. स्वाती शहा मॅडम, सचिव कय्युमभाई मुल्ला, मुख्य मार्गदर्शक महंमदभाई कच्छी, राजुभाई कुरेशी, चंद्रकांतदादा जगताप, मुख्याध्यापक प्रा. के. एम. दिठे सर, एनसीसी चे लेप्टिनंन्ट एन. एस. लवटे सर, विवेक वाहिनी चे प्रा. सुभाष वाघमारे सर, प्रा. नेवसे मॅडम, प्रा. शेळके सर दिपकभाऊ बाटे, आदि मान्यवर उपस्थित होते.


0 Comments