Hot Posts

6/recent/ticker-posts

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल


वडूज
येथील विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह चार जणांवर वडूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. स्वप्नाली अनिरुद्ध घाटगे (वय: २७) असे त्या विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत किसन रस्तुम रणवरे यांनी तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलीसानी दिलेली माहिती अशी की, स्वप्नाली घाटगे हीचा विवाह नोव्हेंबर २००९ मध्ये अनिरुद्ध अरुण घाटगे (रा. मोळ, सध्या वडूज) याच्याशी झाला. अनिरुद्ध याचा सराफी व्यवसाय असल्याने धान्य बाजार येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. स्वप्नालीचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यानंतर चारित्र्याच्या संशयावरून तिचा पती अनिरुद्ध, सासरा अरुण घाटगे, सासू शोभा घाटगे, नणंद अनुराधा शिंदे, अरुंधती घाटगे हे जाचहाट करत असल्याचे तिने सांगितले होते. त्यावर स्वप्नांलीची बहीण व भाऊजी यांनी सासरच्या लोकांना समजावून सांगितले होते. काही दिवसानंतर स्वप्नालीचा पती, सासू-सासरे, नंणदा हे तिला फ्लॅट खरेदीसाठी माहेरहुन पाच लाख रु. तसेच ट्रक खरेदीसाठी दहा लाख रु. घेऊन ये अशी मागणी करून तिचा जाचहाट करत होते. या जाचहाटेला कंटाळून स्वप्नांली हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के करीत आहे.

Post a Comment

0 Comments