Hot Posts

6/recent/ticker-posts

मंत्रालयाच्या मजल्यावरून आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या शेतकरी तरुणाला खाली उतरवलं


विक्रम चोरमले: मुंबई 
मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याची धमकी एका तरुणानं दिल्यामुळे मंत्रालयात गोंधळ उडला होता. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा कृषीमंत्री मला भेटत नाहीत व माझ्याशी बोलत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा तरुणानं घेतला होता.

ज्ञानेश्वर साळवे असं या तरुणाचं नाव असून तो तरुण उस्मानाबादचा असल्याची माहिती मिळत आहे. या तरुणांच्या या विचित्रपणामुळे मंत्रालयात धावापळ सुरू होती. या तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाची टीम, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. तब्बल दोन तासांहुन अधिक समजूत काढण्याचे प्रयत्न चालू होते यात पोलिसांना  ज्ञानेश्वरची समजूत काढण्यात यश मिळालं आणि खाली उतरवलं. या आत्महत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने हे का कृत्य केलं याची चौकशी पोलिसाकडू सुरू आहे.

Post a Comment

0 Comments