Hot Posts

6/recent/ticker-posts

सिग्नल तोडून जाताय... जा, दंडाची पावती येणारी घरी, सातार्‍यात आता इ-चलन, कराड, फलटणला होणार सुविधा


सातारा
वाहतूक पोलीस समोर उभा आहे, त्याला काय घाबरायचंय सिग्नल अजून सुटायचाय, अति घाई त्यामुळे सिग्नल तोडून पळताय हे सातार्‍यात काय किंवा कराड, फलटण शहरात सर्रास पाहावयास मिळणारे चित्र. पण, आता सावधान पळू नका. कारण सातारा शहरात इ-चलन सुविधा सुरु होत असून अशा पळपुट्यांचे फोटो काढून त्यांना दंडाची पावती थेट तुमच्या घरी पाठवण्यात येणार आहे. केवळ फोटोच नव्हे तर अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचीहीयासाठी मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईच्या धर्तीवर सातारा, कराड, फलटणच्या वाहतुकीला शिस्त लागेल, अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही.

वाहतूक शाखेकडून ई-चलान सुविधा सुरु होणार

सातारा सातारा जिल्हयातील वाहतुक नियंत्रण शाखेचे कामकाज पेपरलेस व ऑनलाईन व्यवहारासाठी प्राधान्य देण्यासाठी सातारा शहर, फलटण शहर, कराड शहर येथे ई चलान सुविधा सुरु करण्यात येणार आहे, अशी वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश  घाडगे यांनी दिली आहे.

प्रथमत: सातारा  शहरामध्ये या सुविधेची सुरुवात होत असून त्यानंतर  कराड व फलटण शहर येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या पुढे जे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्‌ल्ंघन करुन पळून जातात अशा वाहनांचे फोटो घेवून त्या वाहनांचे नंबर घेवून वाहन मालकांच्या पत्त्यावर पोलीसांमार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे. भविष्यात  कार्यप्रणाली सी.सी.टी.व्ही च्या मदतीने आणखीनच अद्यावत करण्यात येणार आहे, असेही श्री. घाडगे यांनी सांगितले.       

Post a Comment

0 Comments