Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकार तुमचंय, दाखवा पालिका बरखास्त करून, माधवी कदमांचे पत्रक, जनतेचा अपमान केल्याची टीका


सातारा
आम्ही जनहिताचे प्रश्‍न प्राधान्याने हाती घेवून ते सोडवण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. या सत्तेचा त्यांना उन्माद आला असून तुमचं सरकार आहे, पालिका बरखास्त करून दाखवाच, असे आव्हान नगराध्यक्ष माधवी कदम यांनी भाजपच्या नगरसेवकांना पत्रकाद्वारे दिले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भाजपाच्या नगरसेवकांनी मंजूर करुन आणलेला रस्ता निधी योग्य त्या पद्धतीने वापरात आणण्याची कार्यवाही सुरु आहे. दैनंदिन कार्यक्षम प्रशासन देण्याबरोबरच भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आदी उल्लेखनिय बाबी गेल्या वर्षभरात मार्गी लागलेल्या आहेत. भाजपा नगरसेसवकांनी काल पालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. ती बिनबुडाची आहे. तथापी, ही मागणी करुन, त्यांनी सातारकर जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघाती पलटवार करत, भाजपाच्या नगरसेवकांनी मोघम घोषणा व आरोप करायला सुरुवात केली असल्याचे त्या म्हणाल्या.
  त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत कोणताही मुद्दा व्यवस्थित नव्हता. त्यांनी युनियन क्लबच्या मागील जागेच्या उद्यानाबाबत केलेल्या नेमक्या प्रयत्नांना कोठेही संदर्भ दिसत नाही.

पालिका ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तथापि घटनादत्त संस्था आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक नेमण्याची केलेल्या मागणीवरुन भाजपा नगरसेवकांची मानसिकता कोणत्या थराला गेली आहे. याची प्रचिती येते. लोकनियुक्त नगराध्यक्षांना पायऊतार करावे ही देखील मागणी वैचारिक दिवाळखोरी दाखवणारी आहे. केंद्रात आमची सत्ता आहे. राज्यात आमची सत्ता आहे.

म्हणून आम्हाला सातारा पालिकेत सत्ता पाहिजे. पण नागरिकांनी आम्हाला सत्ता दिली नाही. त्यामुळे मग सत्ता ज्यांच्या हाती दिली आहे. अशा व्यक्तींची सत्ता बरखास्त करु. अशी धमकी देणे म्हणजे सत्तेचा उन्माद आहे. आम्हाला सत्ता नाही तर दुसर्‍यालाही सत्तेत बसू देणर नाही. अशी आत्मकेंद्रीत भूमिका भाजपा नगरसेवकांची दिसून आली असून ती त्यांनाच शोभून दिसते. त्यांनी जरुर तर राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून, सातारा पालिका बरखास्त करुन दाखवावी आणि प्रशासक नेमावाच.

Post a Comment

0 Comments