प्रतिनिधी
वाळवा येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डीस्पर्धेत ÷उत्कृष्ट खेळ करूनही केवळ पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सातारा उपविजेता ठरला. वास्तविक या स्पर्धेत साताराच विजेता असल्याचा प्रेक्षकांसह खेळाडूंचाही ठाम आत्मविश्वास असून या चुकीच्या निर्णयामुळे क्रीडाप्रेमी व सातारा जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कबड्डी पंच, समीक्षक व पत्रकार आणि राष्ट्रीय खेळाडू समीर थोरात म्हणाले, ‘राज्य अजिंक्यपद कबड्डी मधे सातारा जिल्हा उपविजेता ठरला, खरंतर सगळ्या महाराष्ट्रानी पाहिले की कोण जिंकले पण पंच म्हणजे देव असतो हेच आम्हला शिकवले गेले आहे,आणि आज पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे (खुप स्तुत्य कामगिरीमुळे) सातारा हरला ते पण अवघ्या 4 गुणांनी,क ोणाला काय प्रतिक्रिया असेल तर मी सक्षम आहे. कारण, वर्षभर आम्ही घडवतो कष्ट घेतो आणि पंच येतात त्यांचे काम करुन जातात. आता मोबाइल मुळे सर्वजण मॅच शूट करतात. मी अजून पण सांगतो की साताराच जिंकलाय. कारण, पंचाना सातारला जिंकून द्यायचे नव्हते, असे निकालावरून वाटते. पण, तुमचा जो काय राग असेल तो मैदानात खेळाडूंवर नको. काय असेल ते आमच्यावर काढा. आम्ही खंबीर आहे. मी पण राज्य पंच आहे, राष्ट्रीय खेळाडू आहे आणि मान्यताप्राप्त पत्रकार आहे. ज्या पंचाना प्रत्येक निर्णय द्यायला जर कोणाची मदत हवी असेल असे पंच राज्य अंतिम फेरी साठी कसे निवडते?यांच्या अशा निर्णयामुळे आमची वर्षानुवर्षाची मेहनत वाया जाते.
आक्षेप असेल तर सांगा, मी सक्षम
वाईट एवढेच आहे आणि माझे आव्हान आहे की त्या पंचाना आज सुखाची झोप येणार नाही. का ते त्याना चांगलेच माहीत आहे. मी एवढेच सांगेन की साताराच जिंकलाय. ज्यांना कोणाला आक्षेप आहे त्यानी माझ्यावर कारवाई करा मी खुप सक्षम आहे त्याना उत्तर द्यायला.-समीर थोरात

0 Comments