Hot Posts

6/recent/ticker-posts

माण तालुका दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प, तहसील कार्यालयात विशेष बैठक


दहिवडी/ भास्कर गेंड यांजकडून 
२२ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांची तहसील कार्यालयात विशेष बैठक  आयोजित करण्यात आली होती. .तहसीलदार सुरेखा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावर्षी माण तालुक्यातील10 गांवे आर्ट ऑफ लिविंग,4 गांवे श्रमजीवी संघटना,5 गांवे कोरो, जलयुक्त शिवार अभियान, पाणी फौंडेशन, ड्रीम सोशल फौंडेशन,माणदेशी फौंडेशन,स्थानिक लोकप्रतिनिधी,व सर्व माणवासीय यासारख्या अनेक माध्यमातून माण तालुका दुष्काळमुक्त करण्याचा  संकल्प या बैठकीत करण्यात आला  यासाठी सर्वांनी  एकत्र मिळून काम करण्याचे ठरविले यावेळी मागील स्पर्धेत पाणीदार झालेली  बिदाल,  अनभुलेवाडी,परकंदी,कारखेल,काळेवाडी, किरकसाल,इ गावांच्या सरपंचांनी ,ग्रामस्थांनी आपापल्या गावांची पाणीदार गांवे करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी काय कष्ट घेतले त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

आर्ट ऑफ लिविंग मार्फत प्रा.जयप्रकाश जाधव,कोरो मार्फत  मा.रणपिसे ,श्रमजीवी संघटना मार्फत मा.कोळेकर,व पाणी फौंडेशन मार्फत विभागीय समन्वयक मा.आबा लाड  यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्तियाज नदाफ, प्रस्ताविक अजित पवार, आभार डॉ प्रदिप पोळ यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments