Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवेंद्रराजेंना भेटण्यात स्थानिक पुढार्‍यांचा अडथळा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची खंत


सातारा
‘महादेवाला भेटण्याअगोदर नंदीला खुश करावं लागतं’, अशी सर्वसामान्य जनतेची समजूत अथवा भावना आणि हो ती खरीही आहे. याचाच प्रत्यय सध्या सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजेंच्या बाबतीत येत असून स्थानिक पुढारी आमदारांना भेटूच देत नसल्याची सर्वसामान्य नागरिकांची खंत आहे. त्यामुळे आता ‘बाबांनी’, अशा पुढार्‍यांचे वेळीच कान टोचावेत, अशी मागणी होत आहे.

सातारा-जावली तालुक्यात आमदारकीच्या काळात शिवेंद्रबाबांनी कामाचा झपाटा कायम ठेवला आहे, हे सर्वश्रूत आहे. आता आमदार म्हटल्यावर सर्वच लोकांना ते भेटू शकत नाहीत, हे ओघाने आलेच. त्यासाठी स्थानिक पुढार्‍यांमार्फत प्रश्‍नांची सोडवणूक होते. परंतु, आता हे पुढारीच द्वाड झाले असून ते सामान्यांना ‘बाबां’पर्यंत पोहोचू देत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. जावली तालुक्यातील रस्त्यांसाठी नुकताच 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर झाल्याबाबतचे वृत्त ‘सुरुचि’वरून आलेल्या पत्रकानुसार दैनिक सत्य सह्याद्रीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाले होते. या वृत्तावर सातारा जावलीतून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. आमदारांच्या पाठपुराव्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले.

मात्र, जावली तालुक्यातील भणंग गावातील कार्यकर्त्यांनी ‘आमदार साहेब आमच्या भणंग गावासाठी काहीतरी करा, स्थानिक पुढारी तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचूच देत नाहीत’, एक शल्य, अशी प्रतिक्रिया जाहीररित्या व्यक्त केली. आहे. त्यावर अन्य काही कार्यकर्त्यांनी एकदंम मनातलं बोललांत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

केवळ भणंगची ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक असली तरी दोन्ही तालुक्यातील अनेक गावात कमी-अधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ‘बाबां’नी वेळेत या अशा स्थानिक पुढार्‍यांना खडसवावे, अशी प्रामाणिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. 

Post a Comment

0 Comments