सातारा
राष्ट्रवादी ,रासप, कांग्रेस ,आता पुन्हा राष्ट्रवादी ही तुमची पक्षबदलाची परंपरा असल्याने तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नये आणि सध्या तुम्ही राष्ट्रवादीलाच लाथा घालण्याचे काम सुरू केले आहे .त्याअगोदर विधानसभा निवडणूकांच्या वेळी प्रभाकर घार्गे,स्व सदाशिवराव तात्या पोळ यांचेकडून घेतलेले पैसे आधी परत करा.आणि मग आम्ही बाजार केला अशा टीका करा, अशा शब्दात डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी सुरेंद्र गुदगे यांना प्रत्त्युत्तर दिले.
ते मायणी येथे आयोजित जाहीर सभा व नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार समारंभात बोलत होते .
डॉ येळगावकर म्हणाले, निष्ठेची भाषा तुम्ही करू नका. करण ज्या माजी सरपंच महादेव यलमर यांनी आयुष्यभर संघटनेची व स्व भाऊसाहेबांची निष्ठा वाहिली.त्या महादेव यलमर यांची गेल्या पंचवार्षिक ला सरपंच पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी चुकीच्या गोष्टीला विरोध केल्याने या चांगल्या माणसाला सक्तीच्या रजेवर घालवण्याचे पाप तुम्ही केले आणि निष्ठेचा शब्द तुम्ही आम्हाला सांगता आहात का? ज्यांनी आयुष्यभर निष्ठवंतांना पायदळी तुडवले,आणि नेहमीच अर्थपुर्ण राजकारण केल .अशा गोष्टीची काविळीच सुरेंद्र गुदगेना झाल्याने त्यांना सगळं जग पिवळच दिसत आहे .त्यामुळे निष्ठेची व अर्थपूर्ण व्यवहाराची भाषा सुरेंद्र गुदगेनी आम्हाला करू नये. यापुढे मायणीचा विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा .पुन्हा असले शब्द वापरू नका. तुमचे राजकारण तुम्ही करा आमचं राजकारण आम्ही करू .यापुढे गावात रस्ते , बायपास रस्ता,पिण्याच्या पाण्याची सुविधा सह विविध शासकिय योजना मायणीत राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन सरपंच सचिनभाऊ गुदगे,उपसरपंच सुरज पाटील व मातोश्री सरुताई विकास पॅनेल चे सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच महादेव यलमर, माजी सदस्य व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला .
मायणीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास
यावेळी बोलताना नूतन सरपंच सचिन म्हणाले, दारुण झालेला पराभव स्वीकार करण्याची विरोधकांची मानसिकता नाही. काटेरी संघर्षांचा वाटेवरून मी आजवर चालत आलो असून अशा पोकळ टीकानां भिणारा हा सचिन गुदगे नाही .सर्वसामान्य मतदारांच्या पाठींब्यावर मी आजवर इथपर्यंत आलो आहे.माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व,ज्यांनी मला बळ दिले ,असे मोठंया मनाचे डॉ दिलीपराव येळगावकर सर्व पदाधिकारी यांचा मी ऋणी आहे. यापुढे लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी मी मागे हटणार नाही.मायणीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून संघटनेच्या विरोधातील लोक असतील ,मला मतदान कोणी केले,कोणी केले नाही याचा विचार मी करणार नसून गावचा सरपंच या नात्याने संपूर्ण गावाला सोबत घेऊन गावा बरोबरच वाडया वस्त्याचा काया पालट करण्यावर माझा भर असणार आहे .सुरेंद्र गुदगेनी राजकारणात स्वतः,त्यानंतर त्यांच्या पत्नी पुन्हा स्वतः अशी वाटचाल केली .स्व भाऊसाहेब गुदगे काका यांच्या जुन्या जाणत्या संघटनेतील कोणत्याही कार्यकर्त्याला पुढं येऊन दिल नाही .आशा लोकांनी निष्ठेची भाषा करू नये .असे सरपंच गुदगे म्हणाले .
यावेळी उपसरपंच अँड सुरज पाटील बोलताना म्हणाले, माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला डॉ येळगावकरं व संघटनेने मनाचा मोठेपणा दाखवून उपसरपंचपदी निवड केली मी सर्वांचा आभार मानतो.मायणीचा सर्वांगीण विकासा साठी सरपंच सचिन गुदगे यांच्या बरोबर व सदस्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असणार आहे.
यानंतर मोहन दगडे,जनार्दन देशमुख,राजेंद्र ठोंबरे,यांनी आपली मनोगते व्यक्त केले .यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख,अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील,वडूज कृषी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ माळी, यशोदीप सोसायटीचे चेअरमन संजय गुदगे,व्हा चेअरमन राजाराम कचरे,मकरंद तोरो यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रास्ताविक राजाराम कचरे तर शेवटी सुरेश वरुडे उपस्थित मान्यवर व लोकांचे आभार मानले .
या जाहीर सभेत सरपंच सचिन गुदगे यांचे भाषण चालू असतानाच डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या मोबाईलवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा फोन आला व त्यांनी मोबाईलवरून मार्गदर्शन करताना " भाजप पक्षाचे सरपंच उपसरपंच निवडून दिल्याबद्दल सर्व मायणीकरांचे आभार .नुकतेच टेंभूयोजनेसाठी ९ कोटी मंजूर केले असून लवकरच हे काम मार्गी लागेल. असे सांगितले.

0 Comments