Hot Posts

6/recent/ticker-posts

औंधसह परिसरात पाऊण तास अवकाळी पाऊस


औंध:-औंधसह परिसरास बुधवारी सायंकाळी चार वाजता सुमारे पाऊण तास अवकाळी पडलेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले.

मागील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे  ऐन थंडीच्या महिन्यात हवेमध्ये कधी उष्मा तर कधी थंडी अशी विचित्र स्थिती निर्माण झाली होती .त्याचबरोबर दोन दिवस सायंकाळी वीजाही आकाशात चमकत होत्या पण पाऊस काही पडत नव्हता. बुधवारी दिवसभर हवेमध्ये कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पण  त्यानंतर पावसाने उघडिप दिली होती. पण चारच्या सुमारास औंधच्या दक्षिणेकडुन वार्यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. 

पळशी, खरशिंगे, करांडेवाडी, गणेशवाडी,जायगाव  व औंधच्या अन्य भागात यापावसाने सुमारे पाऊण तास हजेरी लावली. यापावसामुळे हवेतील उष्णता कमी होण्यास मदत झाली तसेच काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साठून राहिले. यापावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हु ,हरभरा पिकांसाठी फायदा होणार आहे.
फोटो कँप्शन.. औध परिसरात झालेल्या पावसाने शेतात साठलेले पावसाचे पाणी

Post a Comment

0 Comments