Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची जय्यत तयारी


कराड 
सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतलेल्या तेजस शिंदे यांनी महावितरण कंपनीच्या अन्यायकारक धोरणांच्या निषेधार्थ सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी हल्लाबोल मोर्चाचा निर्धार केला असून, मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तेजस शिंदे यांनी या आंदोलनासाठी जिल्हा अक्षरश: पिंजून काढला आहे.

जिल्हाध्यक्ष  शिंदे यांनी पाटण, कराड दक्षिण व कराड उत्तर, खटाव या तालुक्यांचा दौरा करुन युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रत्येक तालुक्यातील संघटनेचा त्यांनी आढावा घेतला आणि तालुक्यातील प्रलंबित प्रश्‍नांविषयी चर्चा केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ताकद वाढविण्याबरोबरच वाडीवस्तीवर शाखा विस्तार करण्याचा निर्धार शिंदे यांनी केला.

महावितरण कंपनीने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य ग्राहकांवर अन्यायाचा वरंवटा फिरवण्यास सुरुवात केली असून, कंपनीच्या धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. महावितरण कंपनीला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त युवक सहभागी होणार आहे, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments