उंब्रज
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या उंब्रज ता. कराड येथील दरोड्यातील संशयितांची तपास कामी चार ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली असून अद्याप तपास यंत्रणेला यश आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले . दरोड्याचा मागे पर जिल्हयातील टोळीचा संबध असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास यंत्रणा कामाला लागली आहे घटनास्थळावरील हाताचे ठसे व सीसी टीव्ही फुटेज च्या माध्यमातून तपास सुरू आहे
उंब्रज ता. कराड येथे बुधवारी रात्री वेगवेगळ्या सहा ठिकाणी दरोडेखोरांनी शसस्त्र दरोडा टाकला होता यात दरोडेखोरांनी एका बंगल्यातील वृद्धेस तोंडावर उशी दाबून खून केला होता व दरोडेखोरांनी सुमारे ३० ते ४० तोळे सोने लंपास केले होते
या कामी काल पासूनच उंब्रज पोलिस शोध मोहीम सुरू केली असून याकरिता वरिष्ठांचे आदेशानुसार उंब्रज पोलिसांची तीन तर स्थानिक गुन्हे अन्वेषण चे एक अशी चार पोलिस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली असून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हि सुरु असलेल्या उंब्रज पोलिसांनी सांगितले
काल बुधवार दि. 22 रोजी उंब्रज मध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धीगांना घालत सहा ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न केला होता यात त्यांनी तीन ठिकाणी लूट केली यातील एका ठिकाणी दरोडेखोरांनी एका वयेवृध्द महिलेचा तोंडावर उशी दाबून खून केला व सदर महिलेच्या अंगावरील सोने लंपास केले आहे.
सदर घटनेनंतर घटनास्थळी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक नवनाथ ढवळे, राजेंद्र साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक पद्माकर घनवट, यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी भेट देऊन तपास करत तपासाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बाबत सुचना केल्या होत्या
या बाबत विविध बाजुने विचार करत तपासाठी स्थानिक तीन व स्थानिक गुन्हे अन्वेषण चे एक अशी पथके तपासासाठी रवाना झाली आहे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस स्टेशनचे हद्दीतील सर्व गावच्या पोलीस पाटलांची मिटिंग घेऊन
उंब्रज व परिसरातील जनतेने भिऊनये असे आवाहन उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सांगितले व लवकरच गावोगावी ग्रामसुरक्षा पथके स्थापन करूण गस्ती सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून याकामी जनतेतून सहकार्याची अपेक्षा आहे.
यापुढे उंब्रज व परिसरातील रात्र गस्तीसाठी पोलिस गाडी सायरण लाऊन फिरवणार असल्याचे यावेळी गुंजवटे यांनी सांगितले

0 Comments