नवी दिल्ली
जानेवारी 2018 मध्ये भारतात होणा-या इण्डो - आसियान परिषदेच्या पूर्व तयारी साठी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यानी बोलाविलेल्या बैठकित सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यानी भाग घेतला. इण्डो - आसियान परिषद जानेवारी 2018 मध्ये भारतात होणार आहे. या मध्ये भारतात व्यतिरिक्त अशियातील दहा देशांचा समूह आहे. आसियान परिषदेत सहभागी होणा-या बहुतांश देशात बौध्द धर्माचा प्रभाव आहे त्याच प्रमाणे सिक्किम राज्यात बौध्द धर्माचा मोठा प्रसार झाला आहे इण्डो - आसियान परिषदेच्या काळात इनर-लाईन परवाना नियम शिथिल करण्यात यावा जेणे करून पर्यटनासाठी येणा-या पाहुण्याना सिक्किम पर्यटनाचा लाभ घेता येईल तसेच नथुला मार्गे कैलास मानस सरोवर यात्रा पुन्हा सुरू व्हावी यासासाठी चर्चा करावी व चीन आणि भारत यांच्यातील नाथुला बॉर्डरवर होणारा व्यापार वाढावा हे मुद्दे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी बैठकित मांडले.

0 Comments