विजेत्या खेळाडूंसमवेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे पदाधिकारी.
सातारा- येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या शालेय कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीने 18 सुवर्ण, 11 रौप्य आणि 7 कांस्य पदके मिळवून अव्वल स्थान पटकावले. सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे या स्पर्धेत सातारा जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळाले.
स्पर्धेत विविध वजनगटात सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या अथर्व गोंजारी, आदित्य जाधव, वेदांत नलवडे, सुमित घाडगे, जय चव्हाण, साईराज चव्हाण, पार्थ ढोणे, आयुष मोकाशी, स्वप्नील साळवी, कुणाल मोरे, आदर्श कांबळे, सौरभ राजे, रिशिका होले, मृणाल जाधव, अक्षता जाधव, यशश्री धनवडे, तृप्ती काकडे, ऋतुजा चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावले.
या सर्वांची अकोला येथे होणार्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सर्व खेळाडूंना अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक विनोद दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, अकॅमडीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, दौलत भोसले, रविंद्र होले, अमर मोकाशी आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments