Hot Posts

6/recent/ticker-posts

येळगावकरांनी उपसरपंचपदाचा बाजार केला : सुरेंद्र गुदगे


सातारा
गेली ५५ वर्षे मायणी ग्रामपंचायत गुदगे गटाकडे होती परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीची सत्ता गुदगे कार्डमुळेच येळगावकर गटाकडे गेली . त्यामुळे येळगावकरांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.आता आपणास सत्तेवर बसण्याची संधी मिळेल असे वाटत असतानाच येळगावकर गटाशी बंड करून आमदार जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली येळगावकरांना आव्हान देणाऱ्या सुरज पाटलांना येळगावकरांनी संधी दिली यामागे अर्थपूर्ण घडामोडी असून सवयीप्रमाणे येळगावकरांनी उपसरपंचपदाचा बाजार केला असल्याची प्रतिक्रिया  जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे देताना सांगितले 

ते पुढे म्हणाले निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पदे वाटण्याची येळगावकरांची संजय गुदगे यांचे पासून सुरू झालेली परंपरा सचिन गुदगे व सूरज पाटील यांचे पर्यंत कायम राहिली येळगावकर गटात निष्ठावान कार्यकर्त्यांना सतरंजी उचलण्याचे काम राहिले आहे.

यावेळी सरपंच उपसरपंच निवडीत येळगावकरांची अवस्था "तेल ही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे" अशी झाली असल्याची कडवट प्रतिक्रिया सुरेंद्र गुदगे यांनी दिली

Post a Comment

0 Comments