Hot Posts

6/recent/ticker-posts

शालेय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत हर्षल जाधव प्रथम


हर्षल जाधव याच्या सत्कारप्रसंगी   वेदांतिकाराजे भोसले , सौ. डिंपल जाधव.

सातारा- येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विद्यावर्धीनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अकॅडमु अ‍ॅण्ड सायन्स ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी हर्षल जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पधर्शसाठी राज्य संघात निवड झाली आहे.

या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी हर्षल जाधव याचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डिंपल जाधव आणि शिक्षक उपस्थित होते. छ. शाहू अकॅडमीत मुलांना शिक्षणासह कला व क्रीडा गुण विकसीत करण्यासाठी विषेश प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांना त्या- त्या क्षेत्रात निपून करण्यासाठी अकॅडमी प्रयत्न करत असते. विद्यार्थ्यांचा बौध्दिक आणि शारिरिक विकास साधण्यासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. हर्षल जाधव याच्या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून यापुढेही तो शाळेचे नाव उज्व करेल, असा विश्‍वास सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments