Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शनिवारी पेठनाका येथे महापरिषद


सत्यसह्याद्री न्युज नेटवर्क 
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व विविध शेतकरी संघटनेंच्या वतीने रविवार  दिनांक १२ रोजी पेठनाका येथे शेतकरी,शेतमजूर व बेरोजगार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत घटनातज्ञ,संस्थापक अध्यक्ष-बी.आर.एस.पी अॅड.डाॅ. सुरेश माने साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.

या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,बळीराजा संघटनेचे बी.जी.पाटील,मानवाधिकार पार्टीचे अध्यक्ष अनिल माने,शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार राजीव आवळे आदींची उपस्थिती राहणार आहे. पेठनाका येथील पुणा बेंगलोर हायवे लगतच्या हाॅटेल मणिकंडन मैदानावर रविवारी  दुपारी १ वाजता या महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments