Hot Posts

6/recent/ticker-posts

उंब्रजला दरोडेखोरांचा धुमाकूळ, वृद्धेचा खून



उंब्रज
उंब्रज ता. कराड येथील बाजारपेठेतील असणार्या एका बंगल्यावर दरोडेखोरांनी शसस्त्र दरोडा टाकला दरोडेखोरांनी बंगल्यातील वृद्धेस तोंडावर उशी दाबून खून केला.  दरोडेखोरांनी अक्षरशः थौमान घालत अन्य पाच ठिकाणी दरोडा टाकला यामध्ये सुमारे ३० ते ४० तोळे सोने लंपास केले आहे. सदरची घटना रात्री १.३० ते ३ वाजणेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने उंब्रजसह परिसरातील नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जैबुन करीम मुल्ला (वय ८६) रा. उंब्रज ता. कराड असे दरोड्यात खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहीती अशी की, काल रात्री १.३० वाजणेच्या सुमारास बाजारपेठेत असणार्या कन्याशाळेलगतच्या अल्ताफ करीम मुल्ला यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला यावेळी बंगल्याच्या पाठीमागील बाजूने आत प्रवेश करुन बंगल्याचे मागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरी करत असताना जैबुन करीम मुल्ला (वय ८६) यांच्या रुममध्ये प्रवेश केला यावेळी त्या जाग्या झाल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचा खून करत त्यांच्या अंगावरील असणारे सुमारे चार लाख ९३ हजार पाचशे रुपये किंमतीचे ३0 तोळे सोने चोरुन दरोडेखोरांनी याच कंपाऊंडमधील अल्ताफ यांचे बंधू रियाज मुल्ला यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला व पाठीमागील दरवाजा कटावणीने फोडत असताना रियाज यांची अभ्यास करत असलेली मुलीला चाहूल लागली. तिने लगेच घरातील लोकांना जागे केले यावेळी दरोडेखोरांनी काढता पाय घेत पसार झाले. त्यामुळे सदरची घटना निर्दशनास आली.  सदर घटनेची फिर्याद सुहेल अल्ताफ मुल्ला (वय ३२) रा. उंब्रज यांनी उंब्रज पोलीसांत दिली आहे. 

तर दुसर्या घटनेत २ वाजणेच्या सुमारास दरोडेखोर पाटण पंढरपूर राज्यामार्गावरील महावितरण कार्यालयासमोर असलेल्या संजय मोरकळ यांच्या बंगल्याचे गेट उघडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील मोरकळ यांच्या पत्नी जागे असल्यांने त्यांनी लगेच मोरकळ यांना सांगीतले. मोरकळ यांनी चोर चोर असा आवाज दिल्याने दरोडेखोर तेथूनही पसार झाले. याबाबत मोरकळ यांनी सांगीतले की किमान ३ ते ४ जण हातात ग्लोज तोंडाला व डोक्याला रुमाल गुंडाळलेले हे लोक हातात कटावणी, कटर, कुर्हाड अशी धारधार शस्त्रे घेवून आली होती. त्यांनी जाताना त्यांच्या कंम्पाउडच्या तारा तोडून टेम्पोतून पसार झाले.

तर तिसर्या घटनेत येथील हायवेलगत असणार्या हॉस्पिटल पाठीमागे असणार्या संजय कुंभार बंद बंगल्याचे कुलुप उचकटून बंगल्यात प्रवेश करुन बंगल्यातील सर्व खोल्यातील साहीत्या उसकटले असून चोरट्यांनी घरातील असणारा सुमारे ५ ते १० तोळे लंपास केले आहे. सदर कुंभार कुटुंबीय जवळच्या नातलगाच्या लग्नासाठी परगावी गेले आहेत. कुंभार यांच्या घराचे कुलुप तोडण्याआगोदर दरोडेखोरांनी शेजारील घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. 

याचदरम्यान दरोडेखोर गावातील भैरवनाथ मंदीरानजीक असणार्या संजीव प्रभाकर जाधव व राजेंद्र गोविंद रावळ यांच्या बंद घराचे कुलुप उचकटून घरातील साहीत्य विस्कटून दरोडेखोरांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये किती ऐवज लंपास केला आहे याबाबत उशिरा प्रर्यंत माहीती मिळू शकली नाही. 

यानंतर दरोडोखोरानी महामार्गावरील शिवडे गावच्या हद्दीतील हॉटेल इडली कामत या हॉटेलवर पहाटे तीन वाजणेच्या सुमारास दरोडा टाकून गल्यातील सुमारे सहा हजार ८०० रुपयेची रोकड लांबवला आहे. सदर चोरीची घटना हॉटेलमध्ये असणार्या सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये तीन चोरटे दिसून येत आहेत. 



घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक नवनाथ ढवळे, राजेंद्र साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक पद्माकर घनवट, यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी भेट देऊन तपास केला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे करीत आहेत.

- जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी वरील सर्व घटनास्थळी भेट देउन तपासकामी सुचना केल्या व सदर दरोड्यातील घटनाक्रम पहाता हे काम परजिल्ह्यातील सराईत टोळीचे काम असल्याचा संशय व्यक्त केला. याकरीता विविध पथके तयार करुन पुढील तपासासाठी पाठवली असून वेळ पडल्यास सी.आय.डीची मदत घेउन लवकरात लवकर तपास पुर्ण केला जाईल. तर या दरोडेखोरांच्या टोळीस मोका लावणास असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments