दहिवडी/सत्य सह्याद्री वृत्तसेवा
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले असून भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला असून येथील जोतिष अभ्यासक विजयकुमार पाठक अण्णा यांनी गुजरातमध्ये भाजपला 122 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. वाहिन्यांच्या अंदाजानुसार 99 ते 120 जागा असा हा अंदाज असून पाठक अण्णांच्या जोतिषीय अंदाजानुसार एखाद दुसर्या जागेचा अपवाद वगळता भाजपला 122, काँग्रेसला 57 व अन्य 3 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

0 Comments