Hot Posts

6/recent/ticker-posts

खंडाळा तालुक्यात अवैध धंदे जोमात: कारवाई होत नसल्याने शिवसेना आक्रमक, जिल्हाधिकार्‍यांकडे धाव


खंडाळा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून पोलीस कोणतीही कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. यासंदर्भात शिवसेना खंडाळा (पश्‍चिम) तालुकाप्रमुख आदेश नामदेव जमदाडे यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांनाच याप्रकरणी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी, मटका अड्डे, बेकायदेशीर वाहतूक असे अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. या व्यवसाय मालकांवर पोलीस कोणतीही कायदेशीर कारवाई करत नाहीत. पोलीस स्टेशनच्या सांगण्यावरून व संगनमताने हे धंदे सुरु असून अनेक पोलिसांना हप्ते दिले जात असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही.


या गावात सुरु आहेत अवैध व्यवसाय

सांगवी, धनगरवाडी, शेखमीरवाडी, अहिरे, नायगाव, वाठार कॉलनी, भादे, विंग, कवठे, वडगाव, लोहोम, मिरजे, अतिट, पळशी, शिरवळ, खंडाळा व अन्य गावे. 

अन्यथा शिवसेना स्टाईल

येत्या पंधरा दिवसांत यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी शरद जाधव, महेश वीर, सागर ढमाळ, महेंद्र भोसले, आनंद चव्हाण, सुधीर नेवसे, गजानन भरगुडे उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments