Hot Posts

6/recent/ticker-posts

अजित दादांच्या दौर्‍याने पाटणची राष्ट्रवादी चार्ज आता 2019 मिशन सत्य‘जीत’


पाटण / सत्य सह्याद्री वृत्तसेवा
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते अजितदादा पवार यांनी चाफळमधून रणशिंग फुंकल्याने पाटणची राष्ट्रवादी चांगलीच चार्ज झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये दौर्‍याने उत्साह संचारला असून राष्ट्रवादीने आता 2019 मिशन सत्य‘जीत’कडे पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे या दौर्‍यानंतर दिसून आले.

राज्यातील सरकारवर घणाघात घालतानाच पाटणच्या आमदारांनाही टार्गेट करत अजितदादांनी सत्यजीतसिंह पाटणकर यांच्यासारखा अभ्यासू आमदार विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले. 2014 साली झालेला युवानेते सत्यजीतसिंह पाटणकर यांचा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला. अर्थात फुटीच्या राजकारणाचा फटका पक्षाला बसला हे वेगळे सांगायला नको. तसं पाहायला गेलं तर संस्थात्मक मोठे काम पाटणकरांच्या माध्यमातून झालेले आहे. तरीदेखील पराभव झाला. या शल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागले. एकसंघतेमुळे पंचायत समितीची निर्विवाद सत्ता आणि ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीतही पक्षाला घवघवीत यश मिळाले.

कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा टेम्पो कायम असून याच टेम्पोला अजितदादांच्या दौर्‍यामुळे बळ मिळाले असून अजितदादांनी दिलेल्या कानमंत्रामुळे 2019 चा आमदार राष्ट्रवादीचा होऊ शकतो, असे संकेत यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. 

Post a Comment

0 Comments