Hot Posts

6/recent/ticker-posts

वसंतगड सोसायटीच्या अध्यक्षपदी तात्याबा कोकरे, उपाध्यक्ष नथुराम कदम


नवनिर्वाचित पदाधिकांर्याचा सत्कार करताना रघुनाथ नलवडे, बाबूराव चव्हाण, सचिन जामदार आदी.
तांबवे/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कमी व्याजदरात व कमी वेळेत अर्थिक मदत विकास सेवा सोसायट्यांनी केल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ नलवडे यांनी केले.

वसंतगड येथील विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तात्याबा पाडुरंग कोकरे यांची व उपाध्यक्ष नथुराम गोपाळा कदम यांची बिनविरोध निवड प्रसंगी बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. उपनिबंधक विलास मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. चंद्रसेन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महिपती कोकरे, माजी उपसरपंच विठ्ठल कोकरे, दूध संस्थेचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण, सदस्य ॲड. अमित नलवडे, सचिव प्रमोद जामदार, सचिन जामदार रविंद्र चिंचकर आदी उपस्थित होते.

माजी सभापती नलवडे म्हणाले , विकास सेवा सोसायटीत येणारा प्रत्येक सभासद हा अत्यंत कष्टातून जात आहे. शेतकऱ्यांना सोसायट्यांच्या माध्यमातून अर्थिक स्तर वाढविण्यासाठी मदत होत आहे. अधिकारी व पदाधिकारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून संस्थेची प्रगती करणे गरजेचे आहे.

ॲड. अमित नलवडे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments