पाटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
शूरवीर सिद्धनाक महार यांच्या महापराक्रमाने पावन झालेल्या भिमा कोरेगावच्या रणसंग्रामाला या वर्षी २०० वर्षे पूर्ण होत आहेत, भिमाकोरेगावच्या या शुरवीराला मानवंदना देण्यासाठी बुद्धीष्ठ ग्रुपच्या वतीने कळंब तालुका मिरज या गावाहून महाराॅली काढण्यात येणार आहे. या महाराॅलीचे सातारा जिल्ह्य़ात सातारा जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे, या महाराॅलीत रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्ह्यातून एक हजार कार्यकर्ते शुरवीर सिद्धनाकांना मानवंदना देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड(बापू) यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिली आहे,
पाटण तालुकाध्यक्ष प्राणलाल माने यांच्या नवीन गृहप्रवेश कार्यक्रमा साठी ते पाटण मध्ये आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अशोक मदने, प. महाराष्ट्र सचिव प्रा. रवींद्र सोनावले,तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, शहराध्यक्ष दिपक भोळे, नंदकुमार कांबळे, विजय थोरवडे,नथुराम चव्हाण, संजय डूबल, यांची उपस्थिती होती.
यावेळी अशोकराव गायकवाड यांनी सांगितले की, या देशात पूर्वीच्या महार समाजाच्या गळ्यात मडके व कमरेला झाडू बांधला गेला होता तो झाडू व मडके काढण्यासाठी शुरवीर सिद्धनाकांच्या नेतृत्वाखाली १ जानेवारी १८१८ साली झालेल्या भिमाकोरेगावच्या रणसंग्रामात ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांना कापून पेशवाई संपवली होती या लढाईने या देशातला जातीयवाद संपवला होता, या लढाईने महाराष्ट्राला नवी प्रेरणा मिळाली, या घटनेला १ जानेवारी रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या वेळी सिद्धनाकां सारखे शुरवीर नसते तर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना हातामध्ये पेन घेता आला नसता व पेन घेता आला नसता तर बाबासाहेबांना या भारत देशाचे संविधान लिहायला मिळाले नसते, भिमाकोरेगावच्या या शुरवीरांना मानवंदना देण्यासाठी व शुरवीर सिद्धनाकांच्या शौर्यला सलाम करण्यासाठी १ जानेवारीला मिरज तालुक्यातील कळंब या गावाहून भव्य महाराॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन अशोकराव गायकवाड यांनी केले आहे.

0 Comments