Hot Posts

6/recent/ticker-posts

31 डिसेंबर रोजी मोठा पोलीस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन


सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबर या दिवशी सर्व तरुणाई तसेच अबालवृध्द मोठ्या उत्साहात असतात. कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 50 अधिकारी व 500 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्ताचा मोठा फौजफाटा नेमनण्यात आला असून, 50 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.
यावेळी दारु पीवून वाहन चालविणाऱ्या वाहनचाकांची ब्रेथ अनायलायझर मशिनच्या सहाय्याने तपासणी करण्यात येणार आहे.  यात कसूरी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 50 अधिकारी, कर्मचारी यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच मुंबई बेंगलोर या महामार्गावर  65 पोलीस वाहने सतत पेट्रोलींग व गस्त घालणार आहेत.
सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागत असा दुहेरी उत्सवाचा आनंद करतांना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी, गोंधळ, गोंगाट व सार्वजनिक शांततेचा भंग करु नये, दारू पिवून वाहन चालवू नये तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments