Hot Posts

6/recent/ticker-posts

परळी वीज वितरण कार्यालयास टाळे ठोक आंदोलन मागे


सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा, कर्मचार्‍यांची दुरुत्तरे कंटाळून संतप्त झालेल्या परळी परिसरातील शेतकर्‍यांनी मंगळवारी येथील वीजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, कार्यालय पेटवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यानंतर आज संबंधीत अधिकाऱ्याच्या झालेल्या बैठकित योग्य निर्णय झाल्याने वीज वितरण कार्यालयास टाळे ठोकण्यास येणारे आंदोलन मागे घेतले आहे.

परळी परिसरातील गावात वीजवितरणचा सावळा गोंधळ सुरु असून वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा, अनियमीत लोडशेडींग करणे, यावर वीजवितरण कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता. आज  मात्र, संबंधित ग्रामीणचे उपकार्यकरी अधिकारी बाळासाहेब मुंडे यांच्याबरोबर  पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी शेतकरी आक्रमक झाले आणि तक्रारीचा पाढा वाचला यावर उत्तर देत मुंडे म्हणाले, परळी येथील काधून रहिमतपूर येथे नेहण्यात आलेल्या कॅप्यासीटर लवकरच परत परळीत बसवला जाईल. अंदाजे येणारी बिले ही येणार नाहीत, शेतीपापंचे भारनियमन भरून दिले जाईल, रिक्त आपरेटरची पदे लवकरच भरली जातील यासह अन्य अडचणी लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी टाळा ठोक आंदोलन मागे घेतले आहे.

Post a Comment

0 Comments