सातारा : राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेच्या रिंगच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी अर्जुन चोरगे, सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटींग, योगेश मुंदडा व इतर.
सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
साताऱ्यात 2007 मध्ये 72 व्या वेस्टर्न इंडिया बॉक्सिंग स्पर्धेनंतर तब्बल दहा वर्षांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने 77 व्या युवा मुलांच्या तर 16 व्या युवा मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन दि. 1 जानेवारी ते 5 जानेवारी या दरम्यान जिल्हा तालिम संघाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रिंगच्या कामाला शुक्रवारी बॉक्सिंग पट्टू अर्जून चोरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्याध्यक्ष रवीद्र झुटींग, योगेश मुंदडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सातारा शहरात तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा तालिम संघाच्या मैदानाची पाहणी करुन प्रत्यक्ष रिंग उभारणीच्या कामाला शुक्रवारी दुपारी प्रारंभ झाला. या कामांच्या शुभारंभप्रसंगी रवींद्र होले, शिवाजी उदय मंडळाचे युवराज भारती, दौलतराव भोसले, सागर जगताप, हणुमंत काळे, हरिष शेट्टी, श्रीरंग मंडप डेकोरेशनचे रमेश साळुंखे, हरिदास साळुंखे उपस्थित होते. यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले, सातारा येथेा होणाऱ्या या स्पर्धेसाठी पूर्णतः नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा खुल्या मैदानात होणार आहेत. बॉक्सिंगसाठी रिंगही उभारण्याचे काम सुरु झाले आहे. प्रखर वीजेचे झोतही वापरण्यात येणार आहेत. तसेच भव्य प्रेक्षा गॅलरी आणि मान्यवरांसाठी व्यासपीठही उभारले जाणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे 25 पंच व राज्य संघटनेच पंच तसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी यांची हजेरी असणार आहे. दि. 1 रोजी या स्पर्धेचा शुभारंभ अर्जुन पुरस्कार विजेता ऑलिपिंक बॉक्सर गोपाल देवांग यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्य ऑलिपिंक असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप व बक्षीस वितरण होणार आहे, असे रवींद्र झुटींग यांनी सांगितले.

0 Comments