मायणी/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
मायणी( ता - खटाव) गावातील मिरज - भिगवण या राज्य मार्गावर असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( सातारा) उपकेंद्र वडुज, शाखा- मायणी चे कार्यालय बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत आहे , येथे न कोणी कर्मचारी ना कोणी अधिकारी , दिवसभर शुकशुकाट असतो , रसत्यावरील मोकाट जनावरे येथे फिरत असतात
तसेच या ऑफिस ची दारे खिडक्या मोडलेल्या अवस्थेत आहेत, परिसरात साफसफाई नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण ज़हाले आहे त्यामुळे रस्त्यावरून येणारेजाणारे लोक मूत्रविसर्जन सुद्धा करतात 'स्वच्छ भारत मिशन ' चा नारा देणारे सरकार आता आपल्याच चुका दुरुस्त करणार काय ? येथील अभियंता असणारे अधिकारी कधीतरी एखादी चक्कर मारतात असे चौकशी दरम्यान समजले , मागील 2 वर्षापूर्वी मायणी गावातील अतिक्रमण काढ़ते वेळी मात्र या ऑफिस ला लोकांच्या येण्या जाण्या मुळे सुगीचे दिवस आले होते .
तसेच मायणी गावातील लोकांना PWD च्या विषयी कामासाठी थेट वडुज (23 km) ला जावे लागत आहे तरी लोकांना याचा त्रास होत आहे , तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी जनतेतुन मागणी होत आहे .



0 Comments