Hot Posts

6/recent/ticker-posts

ढाकणी ग्रामपंचायत कार्यालयाला आग, कागदपत्रे, संगणक खाक


वरकुटे-म्हसवड/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
माण तालुक्यातील  ढाकणी ग्रामपंचायत कार्यालयाला काल गुरूवारी मध्यराञी  राञी शॉर्टसर्किट होऊन ग्रामपंचायत कार्यालयाने पेट घेतल्याने कार्यालयातील संगणक सेट ग्रामपंचायत कागदपत्रे झिरोपेंन्डन्सीची माहिती टेबल प्लास्टीकच्या   खुर्ची आदी साहित्य जळून खाक झाल्याने ग्रामपंचायतीचे ४ लाख ७५ हजाराचे नुसकान झाल्याची तक्रार म्हसवड पोलिसात ढाकणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कृष्णकांत भिमराव खाडे यांनी दिली असून म्हसवड पोलिस या घटनेचा तपास करत आहे 
       
       या बाबत म्हसवड पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी काल गुरूवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कामकाज संपवून ग्रामसेवक संरपंच सौ. रूपाली जयेंद्र खाडे उपसरपंच कृष्णकांत भिमराव खाडे सेवक दिनकर तोरणे यानी ग्रामपंचायतीला कुलूप लावून आपआपल्या घरी निघुन गेले होते आज शुक्रवारी थंडीचा कडाका जास्त आसल्याने नागरीक घराबाहेर लवकर आले नव्हते आज शुक्रवार  दिनांक  २९/ १२/ २०१७ सातच्या दरम्यान ग्रामपंचायतीचे सेवक दिनकर लक्ष्मण तोरणे ग्रामपंचायत झाडलोटसाठी गेले आसताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या एक छोट्या खिडकीतुन धुराचे लोट  व इमारतीच्या वरील पञ्याच्या शेड मधुन धुर येत असल्याचे दिसले त्यावेळी नागरीक हि गोळा झाले होते मी उपसरपंच कृष्णकांत खाडे याना तातकाळ फोन करून ग्रामपंचायत कार्यालयातुन धुर येत असल्याचे सांगीतले ते तातकाळ कार्यालया समोर आले त्यानी ग्रामपंचायतीचे कुलूप काढून प्रथम लाईटचा मेन स्विच बंद करून विज पुरवठा बंद केला व या भागातील लाईटच्या फिव्जा काडून गावातील लाईट बंद केली व या घटनेची माहिती म्हसवड ठाण्यात दिली म्हसवड पोलीस ठाण्याचे ए एम कांबळे व एस एस सानप यानी सदर जळालेल्या ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्याचा पंचनामा केला असता या मध्ये कॉम्प्युटर, प्रिटंर,  पि. सी. ओ., बी. एस. एन. एल.  बाॅडब्रॅड संच , टेबल,  लाकडी कपाटात, व त्या मधे  असलेली कागदपञे, झिरोपेंन्डसीची कागदपञे कारपेट,लाईटचा बोर्ड ,लाईट फिटींग, प्लास्टिक खुर्ची, इमारतीच्या छताची लाकडे, इमारतीच्या छताचा पञा काळा झाला आसल्याने या दुर्घटनेत जिवित हाणी जरी झाली नसली तरी ग्रामपंचायतीच्या साहित्याचे या शॉर्टसर्किटमुळे मोठे नुसकान होऊन जवळपास ४  लाख७५हजाराचे नुसकान झाले आहे  या घटनेचा पंचनामा पोलीस हवलदार कांबळे व सानप सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत  

Post a Comment

0 Comments