सिद्धेश्वर कुरोली/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
येथील युवकांनी एकत्र येवुन स्थापन केलेल्या आणि समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या, सारथी सामाजिक विकास संस्थेला अलीकडेच महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.शेखरजी चरेगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. भेट देवून संस्थे तर्फे राबविण्यात आलेल्या तसेच प्रस्तावित असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करण्यासही ते विसरले नाहीत.
संस्थेतर्फे साहेबांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, अंकित काणे संंस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद गोसावी आणि संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments