पाटणला बी.सी.ओबीसी मेळावा उत्साहात
पाटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा या भारत देशात गेले माध्यमातून प्रस्थापितांचा गुलाम बनलेल्या बहुजन समाजात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित करून गुलामगिरी व दडपशाही खाली वर्षांनुवर्षे खितपत पडलेल्या बहुजन समाजाला न्याय व हक्क मिळवून दिले असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष मा.नेताजी गुरव यांनी व्यक्त केले.
पाटण येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हावशीपेठ या ठिकाणी शुक्रवार दि.१५ रोजी पाटण तालुका बी.सी.,ओबीसी संघटनेच्या वतीने आयोजित प्रबोधन व सत्कार समारंभात ते बोलत होते.
या वेळी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, महिला आघाडीच्या सौ. लक्ष्मी निकम, पाटण तालुका मार्गदर्शक प्रा. रविंद्र सोनावले,जिल्हा कार्यकारिणी सदस्य बबनराव सुतार,पाटण पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब गुरव,संजय हिरवे,पोपटराव खेडेकर, पाटण तालुकाध्यक्ष प्रकाश सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नेताजी गुरव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी सुद्धा या बहुजनसमाजाला प्रस्थापित समाज गुलाम समजून त्यांची पिळवणूक करीत आहे. आज या देशात श्रीमंत श्रीमंतच होत गेले ते गरीबांचे शोषण करत गेले, पूर्वी राजकीय,शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक समता नव्हती, मतदानाचा सुद्धा अधिकारी नव्हता,विषमता होती, पुर्वी परकियांची गुलामगिरी होती आता स्वकीयांची आहे, गुरू द्रोणाचार्यांनी गुरूदक्षिणा म्हणून एकलव्याकडे अंगठा मागितला हि कोणती माणसिकता होती, सर्व बाबतीत अजूनही आमचा समाज मागास राहिला आहे. प्रस्थापित धनदांडगे लोक अजुनही आमच्या समाजावर हुकूमत गाजवतात, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. आता सध्या आरक्षणाच्या नावाने या देशात राजकारण चालू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आनेक मार्ग आहेत पण त्यासाठी मोर्चे काढायची गरज नव्हती, तामिळनाडू राज्याप्रमाणे त्यांना आरक्षण मिळणे शक्य आहे,
यावेळी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, शासकीय अधिकारी रिटे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पाटण तसेच कराड तालुक्यातील बी.सी. ओबीसी बहुजन समाजातील विविध गावच्या ग्रामपंचायतींच्या विद्यमान व नवनियुक्त सरपंच,उपसरपंच,सदस्य चा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र सोनावले सर यांनी केले, स्वागत व सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी मानले.
तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमास मदर इंडिया फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय डूबल, पाटण पंचायत समितीच्या सदस्या उज्वला लोहार, ज्येष्ठ कार्यकर्ते गणपतराव भंडारे, ता. सचिव कृष्णत गुरव(पुजारी) विद्यार्थी संघटनेचे शुभम उबाळे, विकास कदम, भीमशक्ती संघटनेचे बळीराम गायकवाड, रामचंद्र नाईकडे, राजू पवार (परीट) राजेंद्र कदम,संतोष जगताप, उद्धव लोहार, अधिक कुंभार, कृष्णत कुंभार, शशिकांत प्रभाळे, किशोर प्रभाळे, भागोजी शेठ शेळके, अर्चना कांबळे, सुरेखा नाझरे यांच्या सह बहुसंख्येने जनता उपस्थित होती.

0 Comments